पान:संगीत सौभद्र नाटक.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मैकला. सुभद्रा-(ऐकून ) दुस्न कुणी काहीं योलत आहे असे ऐकले की मला लग्नमंडपानच घेऊन जायला येताहेन असे वाटते, देवा ! या संकटातून मी कशी पार पडून हे कळत नाही. तदनंतर राक्षसाच्या रसाने भरलेला असा अर्जुन प्रवेश करतो.! अर्जुन-(भायल्याशी) अरे हा काय चमत्कार! मी त्या राक्षसाला खाली पाडून त्याच्या दरावर बसून न्याचा शिरच्छेद करणार नोंच सो मायावी एकदम अदृश्य झाला, ही गोष्ट फार वाईट झाली. बरें, त्याच्या शोधाच्या नादी लागावे तर ही स्त्री या अरण्यांत एकटीच आहे, तिजवर नवीन संकट काय येईल याचा नेम नाही. ( सुभद्रकंडे पाइन ) अहाहा ! माश्या नेगा सार्थक्य झाले. हाच ती माझी प्रिया सुभद्रा. [चाल कर्नाटकी.] मम जिवाची प्रियकरिणी ॥ वास करित हृदयीं जी होती। दृष्टिपुढे भासत ती तरुणी ॥ध्रु०॥ राक्षस तो मम मित्रचि बाटे । केलि जयाने हितकर करणी॥शा ( भापल्याशी ) आतां कसं बरें करावें ! आपण काही हिला ओळख देऊं नये; तशाहन माझे अंग राक्षसाच्या जखमांच्या रक्ताने सर्व मरून गेल्याने नाही मला ओळखणार नाही, यरें, अगोदर ही आपल्याशी काय भाषण करते ते ऐक. म्हणजे त्याप्रमाणे बतावणी करण्यास बरें पडेल. (एकीकडे ऐकन उभा राहतो.)