या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२.
संगीत ध्रुवचरित्र.
रंजनीय असा भारती प्रयोग पाहण्याची ईच्छा वारंवार प्रदर्शित केल्यावरून व माझ्याही मनांत तसाच नूतन भारती प्रयोग करून रसिकजनांस रंजवावें; असें आल्या- वरून मो अल्पमतीनें आजचा हा प्रसंग आणिला आहे. ( नटी आली किंवा न आली हे पाहून ) मला विचारून गेल्यास तिला बराच वेळ झाला. (पुन्हां पाहून साशंक )
दिंडी.
( राग-लीलां. ताल-दादरा. )
मिया माझी अद्याप कां न आली ॥
थोर चिंता मानसीं उद्भवीली ॥
कदां येइल सिद्धता करायासी ॥
रसिकजन है उत्सूक प्रयोगासी ॥ कदाचित् मागल्या प्रसंगी जशी रागांत होती, तशी तर आतां नसेलना ! ( असें ह्मणून पाहतो तो ती दुसरे नार्गानें आनंदभरित मुद्रेनें येत आहे असे पाहून चकित ) काय हा चमत्कार तरी ! सर्वच उलट ! पहातरी ! आजचा आनंद नि आनंद कसा दिसतो आहेहा ! ( इतक्यांत नटी पद ह्मणत प्रवेश करून. )
नटी-~( सानंदमनाशीच ) ! -
पद.
( चाल – मुजे गंगा नहाने जाना. )
खचीत विलासी वसंत । अहा ! ख० ॥