Jump to content

पान:संगीत ध्रुवचरित्र.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
श्री
संगीत ध्रुवचरित्र.

अंक १ ला.
स्थल रंगभूमि.
मंगलाचरण.
पद.
( चाल-धणी सकल तरणि. )

विमलमनें सकलजनें गावे गुणानुवाद रसनें ॥ ध्रु० ॥ जे ईशचरण हृदयीं सवल । भजति त्यजुनि विषय सकल । बाधक है भव नयन पटल । दूर होइ शीघ्र शुद्ध भजनें ॥ वि० || परब्रह्मरूप सर्वेश ध्यान । सोमुनिही कष्ट महान । प्राप्त केलियास चुकेल जन्म । ज्या श्रीहरी स्तवनें | वि० ॥ ध्रुव नारदादि संत | स्तविति मनीं अखिल अनंत । मगलप्रदहि होवो जनांत । विनायकार्चित सुमनें ॥ वि० ॥ सूत्रधार – ( पुष्पें उडवून) असो, रसिक जन -