Jump to content

पान:संगीत ध्रुवचरित्र.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अंक ३ रा.

 ना०-वत्सा ध्रुवा (असें ह्मणून)

 सर्व – भरत वाक्य -

पद.
( राग - भूपकल्याण ताल-दादरा.)

 आनंदकंद विश्ववंद्य नंद नंदना ||

 नमित पाईं पदरी घेईं कंस कंदना || ध्रु० ॥

 जरा रहित अवन करुनि सकलां जना ||

 तत्र स्तवना गुण श्रवणा पाप मोचना ॥

 पतित मनीं प्रेरि सदा शुद्ध वासना |

 इच्छितसों देइं हेंचि गा ! दयाघना || आ० ॥

( सर्व जातात. पडदा पडतो )

अंक ३ रा समाप्त.