या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अंक ३ रा.
ब्रह्मलिखितां परि हें घडलें । प्रेमभरें आपण राहूं ॥ अ० ॥
झालें तें झालें. तुझी कांहीं एक मनांत आणूं नका.
उ० – (नारदास विनयपूर्वक ) -
पद.
( राग - परज. ताल - त्रिवट.)
मुनी हाचि वर असो अपुला ॥ ध्रु० ॥
बंधुत्व हें अह्मां उभयतांचें ॥
वृद्धिंगत हो अजि असा मजला || हा० ॥
ना० – जा होईल तसें. ( ध्रुवास)–
पद.
( राग भैरवी ताल-दादरा. )
धन्य धन्य धन्य तुझी अल्पवयीं मुला ॥ ध्रु० ॥
अनन्यभावें शरण रिघुनि | उग्र तप आचरूनि ॥
स्वेच्छेनुरुप वर घेउनि ॥ हेतु साधिला ॥ ध्रु० ॥
ध्रु० - ( हात जोडून )
पद-
(राग-भैरवी. ताल - त्रिवट.)
पूर्णकृपेनें तुमच्या | गुरुराया ॥ ध्रु० ॥
होउनी ऐसें पुरित झाली ॥
"मन्मन सकल इच्छा ॥ गु० ॥
ना० -–(प्रसन्नतेनें ) -