Jump to content

पान:संगीत ध्रुवचरित्र.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संगीत ध्रुवचरित्र.

जवळ घेऊन त्यास देवाही सांगितलेलें गुह्य जाणून ते न सांगतां) राजा !-

दिंडी.
(राग-कानडा. ताल-दादरा.)
किती वानूं श्रेष्टत्व तव सुताचें
प्रेम निःसीम असती काय साचे ॥
असें बघुनी तें रूपही स्वतांचें ॥
दावुनीयां पुरविले हेतु ह्याचें ॥

 उ० – आपला अनुग्रह ! मग काय ! ( इतक्यांत ध्रुव आला आहे हे सुरुचीस कळतांच पश्चात्ताप पावून उत्तमासह भेटण्यास येते. व परस्परांस भेटून नारदाच्याही पायां पडते. )

 सुरु० - (सुनीतीस )-

पद.
( राग-असावरी. ताल-त्रिवट. )

 अपराध असे बहू घडला ॥ मजकडुनी तरी

 आपुला || ध्रु० ॥ पोटीं घालुनि सर्वही तो ॥

 क्षमा करा हो मज दीनेला ॥ अ० ॥

 सुनी० – ( जवळ घेऊन पदराने डोळे पुसून कंठ दाटतो ) -

पद.
( राग-भैरवी. ताल-त्रिवट. )

 कष्टि नका मनिं होऊं ॥ अजिहो ॥ ध्रु० ॥