Jump to content

पान:संगीत ध्रुवचरित्र.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अंक ३ रा.

४७

भक्तजनां कल्पतरुही ॥ दुष्ट निंद्य पातक अंता ॥ ब्रह्मादिक सुरवर ध्याती ॥ मंगलमद वेदातीता ॥ मोक्षमुखालायें वसशी | विनतांस्तव त्रिजगन्माता ॥ || चा०॥ कराया तव परिचर्या । दिधलें त्वां मतिस व धैर्या ॥ विघ्न न आलें मत्कार्या ॥ हीच कृपा आज विश्वेशा || पूर्ण० ॥ ( असें ह्मणून नमस्कार घालतो )

 श्री शे० ना० - (वर हात करुन) कल्याण असो-

पद.
( राग-असावरी ताल - त्रिवट. )
सुखवी आपुल्या पितरां सकलां ॥ त्वरितची
जाउनी स्वगृहाला ॥ ध्रु० ॥ भेटीविण वृत्त
कथीं न त्यांसी ॥ स्मर तत्समयि ह्या मद्बोला ॥ सु० ॥

इतकें बरीक चांगले लक्षांत असूंदे.

 ध्रु० - ( हात जोडून ) जशी आपली आज्ञा.

 श्री० – ( ध्रुवास मार्गस्थ होण्यास सुचवून गरुडास) चल( जातात. )

प्र० ५ वा.
स्थल – राजमंदिर.

-

(उत्तानपाद सुनीति बसली आहेत इतक्यांत •प्रेमळा आनंदभरित मुद्रेनें येऊन )

प्रे० –सरकार, आई, आपले ध्रुवमहाराज येत आहेत !