Jump to content

पान:संगीत ध्रुवचरित्र.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४२
संगीत ध्रुवचरित्र.

( इतक्यांत इंद्र ऋषीसह येऊन ) इं० व ऋ० – (बद्धांजली करून करुणस्वरानें)-

पद.
( चाल – सद्गुरु वांचुनी )

 राक्ष रक्षि देवा आतां ह्या दीनांस ॥

 प्राण हे होती कासावीस ॥ ध्रु० ॥

 उग्र ऐशा तपा कोण हो आचरे ।

 ज्या योगें स्वमनें हीं थरारे ||

 मतिहीन झालों खचीत दयाळा ||

 जाई काय पृथ्वी रसातळा ॥ २० ॥

श्री शे. ना० - (उठून) भिऊं नका:-

पद.
( राग - जिल्हा. ताल – धुमाळी.)

 मृत्युलोकीं उत्तनापाद जो नृप सूर्य वंशीं ॥

 साध्वि सुशिल त्या जेष्टपनि सुनीति तिजशी ॥ध्रु०॥

 सुपुत्र जो करित तप तो ध्रुवसेन मजशी

 प्राप्त करावें हिच आस त्या पूर्ण मनीं जयासी ॥ मृ०॥

 ( इंद्रास ) तो तुझ्या इंद्रपदास किंवा ह्या ऋषींस कोणत्या-

 ही प्रकारानें त्रास व्हावा अशा हेतूनें मुळींच तप करित

 नाहीं. तुह्मी निर्भयपणानें रहा.

 ई० व ऋ० – (लवून) आज्ञा. (जातात)