या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संगीत ध्रुवचरित्र.
पद.
( चाल - मागल-सर्वोभुती )
व्यभिचार गर्ने स्वल्पचि त्यास । त्यास ती
कुब्जा अयोग्यचि खास ॥ ध्रु० ॥ तरि होउनि
रत देव तव सहर्ष भोगी। दांभिक ऐसा भजसि
तूं कशालागीं । नच धरि तयास ॥ व्य० ॥
त्यापेक्षां माझ्या सारख्या एकाद्या निर्मळ ब्राह्मणाच्या
भजनी जर लागलास तर खचीत रे खचीत तुला पुण्य
लागेल. आणि अशाच्या लागलास तर उलट महत्पाप !
ह्याचा तूंच विचार कर. कारण तूं समजदार आहेस.
ध्रु० - ( संतप्त होऊन ) अरे-
साकी-
(राग - जोगी. ताल - धुमाळी.)
असशि जन्मला अन्यवंशि तूं द्विजवंशीं नच नष्टा ! ॥
ह्मणुनी दोपिसि प्रभुसी ऐसे उठ चांडाळा दुष्टा ! ॥
जाई येथोनी ॥ न दावी मुख परतोनी || ध्रु० ॥
( असें ह्मणून त्याजकडे पाहत नाहीं. )
व्रा० –बाबा मर्जी तुझी.
ध्रु० – (सद्गदित) -
अंजिनी गीत.
( राग-झिंझोटी. ताल-धुमाळी. )
दुर्जेय किती हरिची लीला ॥ जो या चालक