Jump to content

पान:संगीत ध्रुवचरित्र.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६
संगीत ध्रुवचरित्र.

 इथे काय वसोनी ॥ ध्रु० ॥ निमित्त असें तरी

 काय मानसी । सांग योजुनी येशि वनासी ।

 अल्पवयीं अशी माळ जपोनी ॥ ३० ॥

 ध्रु० – ( उत्सुकतेनें ) -

अंजिनीगीत.
राग - झिंझोटी. ताल–धुमाळी.

 ईश दर्शना उत्सुक झालों । मायवापही

 त्यजुनि निघालो ॥ मुनि वचनानें या स्थलिं

 आलों ॥ कांहीं न भी मजला ॥ १ ॥

परम पूज्य नारदमुनींच्या आशिर्वादें करून मला येथें तिळमात्रही भय वाटत नाहीं. ही त्यांची मजवर कृपाच ह्मणायाची; आणि हल्ली त्यांच्याच आज्ञेनें ईश्वर प्राप्त्यर्थ या स्थलीं मीं वास्तव्य केलें आहें.

 ब्रा० – (साश्चर्य) कोण नारदमुनी!असंभवनीय गोष्ट ! अरे ( केशास हात लावून ) हे काळ्याचे पांढरे झाले, तरी एखादा साधु देखील आमच्या दृष्टीस पडत नाहीं; तर नारदमुनी कोठून दृष्टीस पडणार ! आणि तूं तर ह्मणतोस की "मला नारदमुनींच्या आशिर्वादें करून "तिळमात्रही भय नाहीं" हें आश्चर्यच नाहीं का ह्मणा- यचें ! (थट्टेनें) पर छी: मला नाही वाटत तो नारद असेलसा ! कुणी एखादा भजनी बुवा असेल. आणि