३५
खचीत गुरुवर्य नारदमुनीही येथे येण्यास मला जे सांगि-
तलें तें अगदी यथायोग्य आहे. कारण मुनीजनांस एक-
निष्ट मनानें आपला मार्ग साधण्यास हेंच निरुपद्रवी
स्थल निःसंशय सर्वोत्कृष्ट आहे. (नदीकडे पाहून ) -
महेश्वराच्या शिरीं ॥ जें नांदणें ॥ ध्रु० ॥
जिच्या जळमळे न तुळतहि हें ॥
शरदिंदु चांदणें ॥ जे० ॥
( इतक्यांत प्रत्यक्ष भगवान एका हातांत काठी घेऊन ब्राह्मणाच्या वेषानें जांभई देत येतात त्यास ) यावें महाराज. ( अर्से ह्मणून जवळ असलेले मृगाजीन बस- ण्यास पुढे करून ) आपण आलांत कोठून ? चाललांत कृणीकडे इतक्या रात्रीं ?
ब्रा० - मी ह्या नजिकच्याच खेड्यांतला राहणारा ह्याच वनांत माझ्या गाई चरण्या करितां येत असतात, त्यांस दुसऱ्या मार्गानें घरीं लावून मी ह्या मार्गानें एका ठिकाणी विशेष जरुरीचें कांहीं काम आहें तें करून नंतर घरी जाणार. परंतु
भयंकर ऐशा घोर अरण्यीं। करिशी मुला तूं