Jump to content

पान:संगीत ध्रुवचरित्र.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संगीत ध्रुवचरित्र.
३४

ऐशा परी सकल विधि उरकणे असे ॥

ह्यास्तव त्वरें जाउं चला स्वाश्रमा कसे ॥ प० ॥

आणि आतां आपण येथें फार वेळ उभे राहिल्यानें कदाचित् ह्याच्या ध्यानासही व्यत्यय येईल, ह्यास्तव येथून जावें; हेंच उत्तम. (जातात)

पडदा पडतो
अंक २ रा समाप्त.
अंक ३ रा.
प्र० १ ला.
स्थल---मधुवन व यमुनातीर

.

(आसनस्थ ध्रुव ध्यान विसर्जन करून.)

ध्रु० – ( सानंद ) अहा ! —

पद.
( राग - खमाज. ताल - त्रिवट.)

अप्रतिम ही मधुवन रचना | आल्हादवित

मञ्चित्ताला ॥ ध्रु० ॥ निविड तरूंची शीतल

छाया । असे सुखद किती एकांताला ॥अ०॥

हंस मयुर मृग हे तैसे | क्रीडति त्यजुनि मत्रीं

व्याध भयाला ॥ अ० ||