या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अभिप्राय. रा० रा० मधुसूदनराव कृतानेक साष्टांग नमस्कार वि० वि० नाटकाचा कांहीं भाग आला तो पोहचला. नाटक वाचून पाहिलें. बरें आहे. विनायकराव यानीं इतक्या वयांत इतकें काम केले हे त्यांस भूषण आहे. कळावें, लोभ असावा ही विनंति पंढरपुर ता० ४ आगध सन १८८८. आपला, गणेश दादाजी देशमुख स. जज्ज. पंढरपुर. रा० रा० विनायकराव नमस्कार वि० वि० पुस्तकांतील विषय आबाल वृद्धांसही प्रिय आहेच. कित्येक ठिकाणी भाग नवीन असून मूळच्या भागा प्रमाणेंच सुरस साधला आहे. गद्यपद्य रचना रसाळ आहे एकंदरीत पुस्तक संग्रही ठेवण्या लायक आहे. कळावें. ठाण ता० ५ आगष्ट | सन १८८८. आपला नम्र, बाळकृष्ण विश्वनाथ.