या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अंक २ रा.
पद.
( चाल -जी जी कर्मे.)
तेज: पुंज ती सुंदर मूर्ति त्या स्थलीं असलेली ॥
नेत्र - निमीलन पूर्वक ध्यान-निष्ट वसलेली ॥ ध्रु० ॥
भक्तिभाव पूज्यबुद्धि अंगीं किती वसलेली ॥
अंतःकरण वृत्ति कशि बघ ब्रह्माकार झालेली ॥ तेजः ॥
(असें ह्मणून मधुवनांत जातात. व पुन्हां चकित)
दिंडी.
(राग-लीलांबरी. ताल-दादरा.)
सत्य बालक हा तपोनिधी आहे
उग्र तेजें रवि शशी लोपती है ॥
प्रभु ध्यानीं तरी किती मग्न पाहे ॥
मला साक्षातचि विष्णु भासताहे
( हात जोडतो. त्याप्रमाणे सर्वच हात जोडतात)
दुसरा ऋ० – ईश्वरी अंशच ह्मणायचा. काय हें तप ! नी काय हें अचल ध्यान ! धन्य बेट्याची !
प० ऋ०-(इतक्यांत पहाटेचा समय होत आहे असें पाहून) अं-
पद.
( राग – भूपकल्याण ताल-दादरा. )
पहा ! पहा ! पहाटचा समय होतसे ॥
नदितिरी स्नान संध्यादि जपही तसें ॥ ध्रु० ॥