या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२
संगीत ध्रुवचरित्र.
हेंम०- – अग असे दुसऱ्या तिसऱ्या कडून नाहीं. प्रत्यक्ष नारदमुनीं कडून.
सु० - (आश्चर्यभरित ) काय ह्मणतां ! तर मग असत्य होणार नाहींच. वन्सं माझा बाई जीव राहात नाहीं विचारल्यावांचून. चला तर.
हेम – चल. तुझी तरी खात्री होऊंदे. (जातात )
प्रवेश ४ था.
स्थल – यमुना तीर.
( कांहीं ऋषीमंडळ मधुवनांत ध्रुवाकडे लक्ष देऊन
परस्परांत चाकत होतात. )
पहिला ऋ० -(दुसऱ्यास बोटानें)-
साकी.
( राग - जोगी. ताल धुमाळी. )
ब्रह्मनिष्ट सुकुमार मुनीचें उग्र तपें सकलांला ||
मधुवन मित्रा ! निर्भय झालें स्वेच्छे तप करण्याला ॥
धन्य असो जननी ॥ ऐशा पुत्रा प्रसवोनी ॥ ध्रु० ॥
इतर ऋ० - - (एकदम) खरोखर ह्याच्याच तपोबलानें.
प० ऋ० – ( दुसन्यास बोटानें ) - -