Jump to content

पान:संगीत ध्रुवचरित्र.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अंक २ रा

.

३१

( शोकाकूल होऊन ) चिमण्या ! जरा अम्मळ उन्हांत गेलास की तुझें तोंड कसें लागलंच गोरेमोरे होत असें ! नी आतां ! ( असें ह्मणून कंठ दाटतो इतक्यांत हेमकला नांवाची तिची नणंद येते ) या वन्सं ! ( बसविते )

 हेम० – ( सुनीतीचे डोळे पुसून )-

पद.
( राग-देस. ताल-धुमाळी )

 दुःखित वहिनी । वहिनि कांगे पुसशी । क्षणभरि

 करि विचाराशी ॥ध्रु० || भय ग नाहीं ।

 नाहीं मुळीं त्यासी । व्यर्थ चिंता तूं करिशी ॥

 रक्षीत त्याला । त्याला ग अर्हिनिशी । अहा !

 परम ऋषिकेशी ॥ तरी वदते । वदते सत्य

 तुजशी । न जाळी शोकें शरिराशी || दु० ॥ किती वेळ शोक करित बसणार अशी !

 सुनी० – ( डोळे पुसीत ) वन्सं काय करूं मी ! मला माझ्या लाडक्याचें स्मरण झालें ह्मणजे माझें अंतःकरण दुःखानें कसें विदारून जातें. चैन पडत नाहीं.

 हेम -वहिनी, झाली गोष्ट त्याला काय उपाय ! ! पण खरोखर ध्रुवाला कुण्णा पासूनही भीति नाहीं; लवकरच परत येईल. असे मला मघांच दादानी सांगितले.

 सुनी० – वन्सं येथें कुठून कळायचें झालें ?