या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अंक २ रा.
२७
दुःखद होई सकल हें मजला ||
विरहित मत्व सेना ॥ ध्रु० ॥
( इतक्यांत सुरुची येऊन रागानें )
सुरु० – काय मेलें सारावेळ गेला असेल कुठे
“ नावडतीचें गोड नि आवडतीचें कडू " असें आतांशा
मनांत फार वागूं लागले आहे.
उत्ता० – ( तिरस्कार पूर्वक )-
अंजिनीगीत.
( राग-झिंझोटी. ताल-धुमाळी. )
खडतर तर हे शब्द मञ्चित्ता ॥ गमति खरोखर
कांनीं पडतां ॥ जाई दुष्टे येथुनी आतां उभी नको राहूं ॥ १ ॥
सुरु० – ( संतापून ) मीही कुठें खुशी आहे उभी राहयाला ! बसा घेऊन तिला. (असे ह्मणून पुटपुटत निघुन जाते )
उत्ता० – ( गहिवरून ) -
पद.
( राग - जोगी. ताल-धुमाळी. )
प्रियवत्सा ध्रुवसेना
वाटे न अंकी घेतलें काय ॥ ह्मणुनि अनुतापें
जाशी काय
करूं मी काय वांचोनी