या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४
संगीत ध्रुवचरित्र.
गोवा ॥ध्रु०॥ बालक्रीडन नित्य करोनी ॥
पित्यावरी न क्रोध करावा ॥ बा० ॥ समजलास.
ध्रु० – ( चकित ) आपण माझें सर्व हृद्भुत जाणलें ! ह्या वरून आपण खचीतच देव अहांत. (असें ह्मणून साष्टांग नमस्कार घालतो.)
ना० – ( उचलून ) मुला आपण असा हट्ट धरूं नये. आणि खरोखर मीं देव नव्हे. मुनी आहे.
ध्रु० – ( नम्रतेनें ) योगेश्वर संपन्नमुने ! सुखदुःखांनी व्यथीत झालेल्यास आपण जो हा उपशमोपाय दर्शविलात तो मजसारख्या क्षत्रियास अशक्य आहे. कारण माझें अंतःकरण सुरुचीच्या दुर्वाक्य बाणांनी अगदी विदारण होऊन गेले आहे. त्यांत तुमचें बोधपर अमृतमय वाक्य मुळींच स्थीर होणें नाहीं.
ना०—(मनोनिग्रह पाहून प्रेमानें ध्रुवाच्या मस्तका- वर हात ठेऊन )-
पद ( चाल - किनबहिरेनें )
( राग - पिल्. ताल-दीपचंदी. )
स्वराज्य तडागीं वियोगित हंसा || रेरे आदि-
राज वंशावतंसा ॥ ध्रु० ॥ ब्रह्मरंध जो ब्रह्म
सनातन ॥ मानसीं संततकल्पून ॥ स्व० ॥