या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अंक २ रा.
२३
पद:
( राग काफी ताल-दपिचंदी.)
(चाल-हमारेको खेले ऐसी होरी.)
कोदुनी मंजुल शब्द तरी ॥ येती अवचित ह्या
अवसरीं ॥ ध्रु० ॥ (ध्रुवाकडे लक्ष जातांच जाणून)
सर्वोत्तम जो चराचरि व्यापक | अखिल
अगम्य निगमींही || प्रांजलभावें वालक
प्रेमें ॥ इच्छित तो गिरीधारी ॥ मं० ॥
( तोंच ध्रुव प्रवेश करून)
ध्रु०(करुणस्वरानें) -
पद. (मागील )
देवा भेटे मजला ॥ प्रभुराया ॥ ध्रु० ॥
( ह्मणून नारदास दीनवाणीनें) स्वामिन् आपण कोण ?
ना० वत्सा मला नारद ह्मणतात. माझें त्रैलो- क्यांत गमन असतें.
ध्रु० तर मग मला आपण देव दाखवाल का ?
ना०-- (अंतर्यामी सर्व वृत्त जाणून) बालका-
पद.
(राग - काफी. ताल- दीपचंदी.)
चाल-बावरी बनाई.
बालपणी नसावा || हृदयीं मान अपमान