Jump to content

पान:संगीत ध्रुवचरित्र.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अंक २ रा.
प्र० १ ला.
स्थल – कानन.
(नारद ईश्वर भजन करित.)

ना०-- (प्रभुची धन्यता मानून ) -

पद.
(चाल-जोगीमोरे रामा कहां गयोरे.)

 सनातन प्रभु कवणा न दिसे ॥ क० || स० ||

 || ध्रु० || संतत सन्निध अंतर्यामीं ॥वसुनि

 कर्म शुभाशुभ पाहतसे ॥ स० ॥

(रचना पाहून आश्चर्य भरित) अहाहा !

पद.
(चाल-बस मोरे आखनमो नंदलाला.)
जगदीशा गहन ही तव लीला ॥ ध्रु० ॥
वृक्ष, लता, पशु, पक्षी मनुजादी ॥
निर्मिशि ह्या जगताला ॥ ज० ॥

आणि- (असे ह्मणून पदाचा शेवट करितात)

तव आज्ञेविण दलहि न गळत
इतुकीं सत्ता दयाला ॥ ज० ॥

(ऐकलेसे करून) अं!- -