या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अंक १ ला.
१९
स्थिति घडली ॥ मन्मती गुंगाने कशी गेली ॥
व्यर्थ तरी वृत्ता बदली ॥ दुःखें ॥
सुनी :-फार दुःख झाल्यामुळे भान न राहून दीर्घश्वासोच्छ्वास टाकीत )
साकी.
( राग - जोगी. ताल धुमाळी. )
हतभाग्या मी ह्मणुनी तुजला उदरीं ग्रहणचि केलें ॥ कौतुक करुनी वाढविले म्यां निंद्य तरी का झाले ! ॥ सेवा घ्यायाला || दासि परिसही नृपाला ॥ध्रु० ॥ (ध्रुवास) बाबा तेव्हां राजानें मला आपली भार्या ह्मणणें हें दूरच आहे; ह्यांत सुरुचीचा तिळमात्र अपराध नाहीं ! ती जे ह्मणाली तें सत्यच आहे ! तस्मात-
पद.
(राग - खमाज. ताल - पंजाबी ठेका.)
वांच्छिसि तूं जरि राज्यपदासी ॥
उत्तमा ऐसें निशिदिनी मानसीं ॥ ध्रु० ॥
निर्मत्सरें तरी अधोक्षजासी ॥
त्वरित हो सिद्ध आराधण्यासी ॥ वां ०
आणि बा त्याच्याच योगानें तुझा पितामह सार्वभौम सुख मिळवून प्रभु पदास गेला,
ध्रु० - ( उत्कंठेनें )-