या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संगीत ध्रुवचरित्र.
पद.
( राग-कालिंगडा. ताल-दादरा. )
" इच्छिसी हें स्थान जरी ॥ स्वमनिं तूं मुला
॥ध्रु०॥ योगयागें स्तबुनि प्रभु मद्दर्भि चांगला ||
जन्म घेशि तरी माप्त तें 'तुला' ।। इ० ॥
अशी ती चांडाळीण नागीणी सारखी पुढे सरसावून ह्मणाली.
सुनी० – ( सुरुचीस उद्देशून ) -
पद.
(राग - जोगी. ताल - चुमाळी.)
तुझी गे जिव्हा जळोती ॥ केवि असें वदसी ॥ ध्रु० ॥ एकुलता एक माझा बाळ ॥ मारिशी तं दुःख न अळुमाळ || निंद्य तव वाक्वाण- जाळ ॥ न साहवतची मजशी ॥ तु० ॥ ( असें ह्मणून शोकाकूल होते ) मे० – ( घाबरून ) -
पद.
( राग-धनाश्री. ताल धुमाळी. )
बहुत अहा ! ह्या कालीं ॥ दुःखें व्यथितचि ही
झाली ॥ ध्रु० ॥ जैशी मिळत कोमल वेली ||
अवचित दावानल वेळीं ॥ तैशी अजि ही