ईशक्लपें ती सफल दहाली अनिक न कांहीं याती ॥
यास्तव नृपवल्या ॥ बोल दला मथीं आल्या ॥ध्रु०॥
( असे ह्मणतांच राजा त्याकडे पाहूं लागतो. त्यावरून ध्रुवास उत्तमासारखेच मला मांडीवर घेईल असे वाटून किंचित् आनंदहि झाला. इतक्यांत सुरुची येते व ध्रुवास पाहून )
सुरु० – ( रागानें ) कारव्या ! तूं अन्य स्त्रीगर्भा- पासून जन्मला आहेस. आणि स्वशरिराची योग्यता न जाणतां दुर्लभ अशा अर्थप्राप्ती करितां व्यर्थ मात्र इच्छा करितोस. तर येथून जा, आणि माझ्या उदरीं येण्यास्तव श्रीहरिस भजून मर; ह्मणजे तुला इच्छित स्थान मिळेल. समजलास ! (हें ऐकून ध्रुव फारच निराश होतो, आणि रडें आल्यासारखे करून आपल्या आईकडे निघून जातो. ) काय मेला ! माझ्या लाडक्याची बरोबरी करणार ! ( नंतर राजास विनोदानें ) पुरे आतां त्याचें ते लाड. किती तरी कराल !
उत्ता० – ( बऱ्याच घटका दिवस आला आहे असें पाहून) प्रिये घे ह्याला. (उत्तमास तिच्या जवळ जाण्यास सांगून ) दरबारांत जायचें आहे. ( असें ह्मणून जातो )
उत्ता०- - आई तल लवकल मला भुक लागली.
सु०- --चल. ( जातात )