Jump to content

पान:संगीत ध्रुवचरित्र.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अंक १ ला.

 सु०(कौतुकानें कुरवाळून) लबाड कुठचा. साख- रेचा करतात.

 ध्रु०.-(मिटकी मारून) आई अनिक गोल गोल ग आहे !

 सु० – ( हांसत ) अरे गोडच असायचा ! साखर कडू का असती !

 ध्रु० – ( खाऊ संपल्यावर) अं अं अं आई मला किनई ह्या आपल्या थेदालच्या थोमदत्तानें उगीच "जा लेकाच्या कालव्या इथून" असें ह्मणून मारलें. ( असे ह्मणून स्फुंदत स्फुंदत रडूं लागतो. )

 सु० – ( पोटाशी धरून) नकोरडूं. त्याच्या आई कडून मारवूं बरें त्याला आपण. ( इतक्यांत आंतून स्वै- पाकीण येऊन.)

 स्वै० – (नम्रतेनें) जेवणाची सर्व तयारी आहे.

 सु० -बरें आली. चला. (जातात).--

प्रवेश २ रा.
स्थल- -दरबार.
( सुबुद्धिप्रधान व इतर मंडळी. )

 त्रु० – (लगबगीनें दुय्यम प्रधानास) विशालाक्ष छ तीं कालची सर्व प्रकर्णे. कीं नाहीं तयार ?