Jump to content

पान:संगीत ध्रुवचरित्र.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संगीत ध्रुवचरित्र.

 प्रेम ० – ( नम्रतेनें ) ध्रुवमहाराज एकसारखे रडतात. कांहीं केल्या येत नाहीत.

 सुनी० – कां येत नाहीं. जा त्यास खाऊ देते ह्मणून सांग.

 पे० --बरें. ( जाते व लागलीच ध्रुवास घेऊन येते. )

 मु० - ( जवळ घेऊन प्रेमानें ) काय झाले लाडक्या. ( असें ह्मणून गालाचें चुंबन घेते )

 ध्रुव० -- आई मला खाऊ देथेतना !

 प्रे० – (सुनीतीस ) पाहिलेतना खाऊच्या नांवानें रडेंबिर्डे कुठच्या कुणीकडे गेलें तें.

 मु० - ( पदरानें ध्रुवाचे डोळे पुसून) पोरजात अज्ञान त्याला कांही आहे का ! (प्रेमळेस) जाग. थोडासाच खाऊ घेऊन ये. (प्रेमळा जाऊं लागते तों ध्रुव) ध्रुव – (रडत) अं अं अं मी नाई घेनाल थोलाथाच मला पुत्कलहवा. (असें ह्मणून पदर धरतो.)

 सु० - ( पदर सावरून प्रेमळेस ) बस्सं केलें बाई यानीं. जरा अम्मळ अधिक आण बरका. ( प्रेमळा खाऊ आणून त्याच्या हातांत देते.)

 ध्रु० – (तोंडांत जरासा घालून) आई खाऊ कृताचा ग केल ?