Jump to content

पान:संगीत ध्रुवचरित्र.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अंक १ ला.

 मजकडुनि गा ! प्रभु घडलें ॥ ग० ॥ ह्मणुनी

 मज त्वां सर्व परीनें ॥ पति विरहें निराश्रित

 केलें ॥ ग० ॥

( सुस्कारा टाकून ) मजवरची प्रीति त्या मेलीवर बसून मी अगदींच नकोशी व्हावीना ! ( पुन्हां साशंक ) बरें कदाचित् त्यांच्यावर त्या कंवटाळणीनें जादूविद् तर कर विली नसेलना ! असें जर न ह्मणावें तर -

पद.
( राग-झिंझोटी. ताल-त्रिवट. )

 कधीं न व्हावी वृद्धि त्यांसी मजशीं का बोलण्या ॥

 मृत अथवा सजीव किंवा नाही हे पाहण्या ||

 परि वाटे दुःख मोठे मजलाही सांगण्या ||

 की ध्रुववाळा पंच वर्षी यावेना भेटण्या || खचितच तिनें कांहीं तरी केलें असावें ! ( गहिवरून ) अहा ! देवा !-

अंजिनीगीत.
( राग-जोगी. ताल धुमाळी. )

 मृत्यु जरी मज येई आतां ॥ असह्य परी ही

 विरह चिंता ॥ तरी सत्वरी करि माणांता ॥

 वि॒िनंति हे मानी ||

( शोकाकूल होते. इतक्यांत प्रेमळा नांवाची दासी येते.