________________
(८२) श्रीरामदासकृत समस्तां मनी लागला ध्यास रामा । तुझे रूप ध्यातो सदां योगधामा ।। बहूसाल हे बोलणे काय देवा । अखंडीत हा लोभ आतां असावा ॥ ११ ॥ प्रती उत्तरें राम बोले महेशा । उदाराधिशा सुंदरा देवधीशा ।।। समर्था प्रभू लोकपाळा नपाळा । लिळे जाळिशी पाळिशी या भुगोळा ।। १२ ।। तुझा योग होतां चि आनंद जाला । पुढें देखतां प्राण माझा निवाला ।। दयासागरा सर्व सांभाळ केला । सुखानंद हेलावला तृप्त जाला ।। १३ ।। पुढे बोलता जाहाला तो विरंची । म्हणे आजि हे धन्य वेळा सुखाची ।। तुझा योग होतां घडी अमृताची । बहू स्तूति केली रघूनायकाची ।। १४ ।। किती बंधने पावलों पूर्व पापें । बह दीस ओसंडिले मायबापे ।। बहू कष्ट केलेसि देवाधिदेवा । कृपाळपणे शीघ्र केला कुडावा ।। १५ ।। तुम्हां वेगळे सर्व ही दीन झाले । त्रिकटाचळी बंदि शाळे मिळाल ।। दिनासारिखे जाहले दैन्यवाणे । प्रभ आमचे दःख ते कोण जाण ।। १६ ।। बह कष्टविले तया रावणाने । घडीने घडी त्रासिले दर्जनाने ।। गमे हानि येतां मनामानि चिता । समस्तांस कोणी नसे सोडवीता ।। १७॥ बहू वोखटी वेळ येऊन गेली । कृपासागरा धावणी शीघ्र केली ।। सुतालागिं झेपावला व्याघ्र तैसा । जगज्जन्नका तूं समस्तांस तैस्वा ।। १८ ॥ स्तुती उत्तरे बाळकू काय जाणे । बरे वोखटे सर्व कांहीं च नेणे ।। मुले खेळतां मायबापास चिंता । तयाचे परी बोलताहे विधाता ।। १९ ।। बहू स्तूति केली तया ब्रह्मयाने । कृपाळपणे वारिले राघवाने ।। प्रसंगे विधीचे समाधान केले | मनी दुःख मागील ते सर्व गेले ।। २० ।। पुढे बोलता जाहला बनपाणी । सदा सर्वदा गाइजे जो पुराणी ।। तया सूकृताचा बरा काळ आला । प्रभू रामचंद्रा तुझा योग झाला ।। २१ ॥ बहूतां परी राघवा ऐकलासी । परी परली लोचनांची असोसी ।। पुढे पाहतां देखतां रूप तूझें । जगन्नायका धन्य हे भाग्य माझे ।। २२ ॥ उणे कोटि कंदर्प हे रूप साजे । सदा सर्वदा योगि ध्यानीं विराजे ।। मनी शोधिती भक्त कोट्यानकोटी । बहू साधने ही नव्हे शीघ्र भेटी ।। २३ ॥ कितीएक योगी उदासीन जाले । गिरी कंदरी तूज शोधीत गेले ॥ तयाँ अतरा भेटसी अल्प कांहीं । जनी आमच्या सकृता पार नाहीं ।। २४ ।। म्हणे इंद्र तो स्वामि देवाधिदेवा । ननी सेवका आपलासा म्हणावा ।। घडेना मला भक्तिभावार्थ नाहीं। प्रभ सांगिजे जी मखें कार्य कांहीं ।। २५ ॥ म्हणे राम गा वजपाणी प्रसंगे। रथ मातळी धाडिला लागवेगे । e बहूदीस सिडिले माय बा-बहदीस हो शीणलों मायबापें. f गाइजे जो-देव ऐको. १४. कंदर्प मदन,