Jump to content

पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

युद्धकोड विधी शकते सर्व गंधर्व आले | ऋषी देव तेतीस कोटी मिळाले ॥ ७४ ॥ मिळाले कपी रीस कोटयानुकोटी । सिता आणितां जाहली थोर दाटी ।। शतांची शते धांवती वेत्रपाणी। दळे वारिती गर्नती घोर वाणी ।। ७५ ।। पहाया सिता वीरमांदी मिळाली । प्रसंगी तये दाटणी थोर जाली ॥ बळे टाकिती एकमेकांसि मागे । कपी रीस ते धांवती लागवेगें ॥ ७६ ।। झडा घालिती एकमेकां पुढारें । दिसेना पदी सर्वसेना उभारे ॥ पुढे पाहया घालती मस्तकांते । महा वीर ते हाणिती वेत्रघाते ।। ७७ ।। कितीयेक आकाशपंथीं उडाले । कितीएक ते वृक्ष अनी दडाले ॥ कितीयेक ते फीरती अंतराळी । कितीएक ते घोष उल्हासकाळी ।। ७८ ॥ कपींची दळे चंचळे फार जाली । महाभार देखोनि मागे पळाली ।। बळी गर्जती थोर घोषे फुराणे । वरी साधती अंतराळी किराणे ।। ७९ ।। महाभार देखोनि माहा विरांचे । भ्रमों लागले भार गोळांगुळांचे ॥ दिसेना सिता आर्त पोटीं सरेना । उतावीळ त्यां धीर पोटी धरेना ॥८॥ कपी धांवती शीघ्र पाहावयाला । परी रीघ नाही पुढे जावयाला ।। प्रसंगी महा भार देखोनि दृष्टी । रघुराज तो बोलिला एक गोष्टी ।। ८१ ॥ सिते कारणे वानरी कष्ट केले । किती वेळ हे बाणघाते निमाले । उतावीळ पोटी पाहाया सितेला । दिसे स्पष्ट ऐसे करावे तियेला ।। ८२ ।। महोत्साव यात्रा तथा पर्वकाळी । विवाहीं युद्धांती तथा अंतकाळी ।। गृहा सासऱ्याचे तया जन्नकाचे । नव्हे नित्य ते संगती नोवऱ्याचेd ॥ ८३ ॥ पढे धाडिले शीघ्र त्या अंगदाला । म्हणे रे तया सांग बीभीषणाला ।। म्हणावे बळे आपले लोक वारा । पढें शीघ्र येऊनियां दूरि सारा ॥ ८४ ।। त्वरें धांवला राव त्रीकटवासी । बह वारिले मारिले राक्षसांसी ।। पुढे काढिले पट्टे कूळा सकळा । दिसों लागली जानकी दिव्य बाळा ।। ८५ ॥ समस्ती सिता देखिली आदरेशी। असंभाव्य सौंदर्य लावण्यराशा ।। तये देखतां सर्व सखे निवाले । कपी बोलती आजि निःपाप जाले ॥ ८६ ॥ सिता देखती जाहली रामचंद्रा । ममस्कार केला तसा ची महेंद्रा ।। तया राघव पाहिले जानकीला । पढे भ्रलता वक्र अव्हेर केला ॥७॥ उदासीन ते जानकी लागि केले । सभामंडळी सर्व बेरंग जाले ।। सभेमाजि ते बोलती एकमेकां। सितेलागि अव्हरिले राघवे कां ॥॥ अवस्था बहू लागली ते प्रसंगी । बुडाले कपी वीर सर्वै विरंगी ॥ ८१. आर्त आवड. d नव्हे नित्य ते संगती नोवऱ्याचे-नव्हे निंद्य ते संगतीने वराचे. ८२. पट्ट-पडदे.