________________
(७२) श्रीरामदासकृत बळे सोडितां शक्ति नेटे सरारी । महा वात प्रख्यात पिच्छी भरारी || मही सप्तपाताळ घोघे गरारी । पळाली भुते काळ पोर्टी थरारी ।। ७५ ॥ फैणी कूर्म वाराह चक्कीत जाले । विमानाहुनी देव ऋषी पळाले ।। ग्रहो सोम सूर्यादि पोटी गळाले । कपी खेचरां दिग्गजां कंप जाले ।। ७६ ॥ प्रसंगी तये थार उत्पात जाला । नभींशोणितींचा बळे मेघ a आला ॥ धमारा बह दाटलासे दिगंती । असंभाव्य ते ऊलकापात होती ।। ७७ ॥ बळे कोपले रुद्र काळाग्नि जैसे । अरीराय ते मातले भीम तैसे ।। तयां झंजतां कोण कोणा निवारी |रणी भीडती काळ कादंडधारी ।। ७८ ।। रिपू सोडिती घोर शस्त्रे झणाणा | बळे वाजती बाणभाळी खणाणा ।। बहसाल स्फल्लिंग जाती फणाणा। महीमंडळी घोष ऊठे दणाणा |॥ ७९ ॥ महाशक्ति ते काळरूपें कडाडी । असंभाव्य ते ज्वाळवन्ही भडाडी ।। मही मेरु मंदार घोषे गडाडी । बळे शोषला सिंधु पोटी तडाडी ।। ८० ॥ पुढे राघवे लक्षिले रावणातें । बळें मस्तके तोडिली बाणघातें ।। गिरीशीखरांचे परी ती विशाळे | पुन्हा नीघती कंठनाळे ढिसाळे ।। ८१ ।। शिर देखतां राम चक्कीत जाला । ह्मणे मृत्यु नाही गमे रावणाला ।। वदे मातली स्वामि देवाधिदेवा । संघावक्ष भेदून शत्रू वधावा ।। ८२ ।। कपी फोडिली वाणघातें निघातें । तये रावणू चालिला मृत्युपंथें ।। ऋषी देव गंधर्व ते सर्व तो । विमानी सुखें गर्जती नामघोषे ॥ ८३ ।। नभी दुंदुभी वाजती एकनादें । बहूतांपरीची बहू साल वायें ।। ध्वनी दाटले पूर्ण ब्रम्हांड घोपें । कपी गर्जता नामघोषे विशेषे ।। ८४ ॥ सुखानंद आनंदली सर्व सृष्टी । विमानाहुनी जाहली पुष्पवृष्टी । ऋषी देव गंधर्व सर्वे मिळाले । विणे लाउनी नारदादीक आले ।। ८५ ।। मिळाल्या सुखे नायिका अष्ट भावे । करी ताळ मुर्दैग वीणे स्वभावे ।। कळा कौतुकें दाविती ते प्रसंगी । गणी नाँचणी नाचती रागरंगीं ॥ ८६ ।। बहू गायने थार गंधर्व गाती । कळा ऐकतां देव थकीत होती ॥ जयाच्या अलापे देहेभाव जाती । मगे श्वापदें लाभल्या त्या द्विजाती ।। ८७ ॥ रूपें सुंदरी किंनरी दिव्य यंत्रे । बहू साल विद्याधरी गूणपात्रे ।। उठे रागकल्लाळ सप्त स्वरांचा । गमे वोळला मेघ हा अमृताचा ॥८८ ॥ ३७. फणी शेष ३८. खेचर आकाशांत फिरणारे गंधर्वादि. ३२. शोणितरक्त. 2 नभी शोणिताचा बळे मेघ जाला-नदो शोणिताचा बळें पूर आला.४०. बाणभाळी बाणांचा समह. ४१. स्कुलिंग-ठिणग्या. १२. सिंधु समुद्र. ४३. सुधा अमृत. 22. नायिका अप्सरा. १५. नाचणी-नाचणाल्या कळघांतिणी. १६. द्विजातों पांखरें.