________________
(७०) श्रीरामदासकृत पुढे ऐकतां राम बोले तयासी । म्हणे ऐकरे रावणा गर्वराशी ।। असंभाव्य रे वैभवे मातलासी । मराया रणी आनि तूं पातलाशी ॥ ४५ ॥ म्हणे राम रे रावणा वीरधर्मे । रणामाजि मी तूज मारीन नेमे ।। पळालासि कोठे तरी हे सुटेना । तुझी मृत्युवेळा कदां पालटेना ।। ४६ ।। रिपू जाणरे तूजला मृत्यु आला । दिल्हे अक्षयी राज्य बीभीषणाला । सिते कारणे थोर कापटय केलें । अभाग्या तुझे सर्व ही राज्य गेलें ॥ ४७ ।। तये बोलतां कोपला वीर गादा । रणामाजि त्या घर्डिल्या वजदाढा ।। पुढे शूळपौणी करी सज्ज मेदा । बळें वोदितां चूकला राम वोढा ।। ४८ ॥ कडाडीत घोघे रणी तेचि काळीं । रघुनायका बैसला बाण भाळी ॥ असंभाव्य तो कोपला चापपाणी । दशग्रीव तो छेदिला शीघ्र बाणी ।। ४९ ॥ बळे मारिती वारिती बाणजाळे । पुन्हा क्षोभले धांवती ते उफाळे ।। रिपू कोपला थोर काळाग्नि जाला । तया रावणा थोर आवेश आला ॥ ५० ॥ प्रतापे रणी राघवे एकवेळे । बळे फोडिली बाणघातें कपाळे ।। रथी सारथी पाडिले अश्व जे कां । विरें नीकुरे भेदिले एकमेकां ।। ५१ ।। बळे छेदिता जाहला वोष्ट दंती। बह बाण ते सोडिले व्योमपंथीं।। कितीएक ते राघवे चूर्ण केले । कितीएक ते बाण अंगी बुडाले ।। ५२ ।। तया देखतां रावण हाक फोडी । असंभाव्य ते मागुते बाण सोडी ।। बळे अश्व ते मातली भग्न केला । ध्वजस्तंभ तो शीघ्र छेदन नेला ।। ५३ ।। भयातूर ते भार गोळांगुळांचे । ऋषी देव गंधर्व इत्यादिकांचे ।। रणी आगळे दाखवी लंकनाथू । भये बोलती मांडिला की अनयूँ ।। ५४ ॥ पडे मातली अश्व ते पळवीले | ऋषी देव गंधर्व साशंक जाले || कपी बोलती मांडले बिघ्न हे की। रणामाजि त्या रावणे जिकिले की ।। ५५ ।। अगस्ती ऋषी तो रणामाजि आला । रणी मंत्र सांगे तया राघवाला ।। जपे आदरें राम तो मूळ मंत्रे । रवी शीघ्र येऊनि दे सारशस्त्रे ।। ५६ ॥ ह्मणे राघवा जिकिशी रावणाला । अती काळ हा वेळ नाही तयाला ।। पुढे राघवे विधिले पंच बाणीं । तुरंग रणी पाडिले दैन्यबाणी ।। ५७ ।। रणी राघवे चूर्ण केले रथाचे । बळे ऊसने घेतले मातलीचे || विरें सारथी धाडिला मृत्युपंथें । ध्वजस्तंभ तो पाडिला बाणघाते ।। ५८ ।। पुन्हा राघवे मागुती तेचि काळीं । रिपू भेदिला बाणजाळी कपाळी ।। सुरां देखतां योर आनंद जाला । महद्भूत तो वानरी घोष केला ।। ५९ ॥ २७. शूळपाणोशळ आहे हाती ज्याच्या असा. २८. गोलांगुल वानर, २९ साशंकभयाभीत.