________________
युद्धकांड, बुधा मंगळा थोर आकांत आला । शनी सोम तो आपधाके पळाला ॥ ३० ।। ग्रहानेंग्रह भूतलाप्रत आले । विमानाहुनी देव धाके पळाले ।। दिशा दिग्गजा व्यापिलें अंतकाळे । चळी द्वि चळी कांपतो ते चळाळे ।। ३१ ।।. महावीर ते मातले घोर मारें । दिशा दाटल्या व्यापिले अंधकारे । पुढे पाहतां येकमेकां दिसेना । ध्वनी मातली ऊठले घोष नाना ।। ३२ ॥ महावीर दोघे रणी स्तब्ध जाले । पुढे पाहतां बाण वाणी गळाले ॥ पुन्हा मागुती हाणिती एकमेकां । भरें नीकरें टाकनि थोर शंका ।। ३३ ।। पुढे रावण पन्नगास्त्रास सोडी । तये चालिल्या त्या नभी सर्पकोडी ॥ उभ्या वानरामाजि आकांत जाले । मुखे बोलती सर्प रे सर्प आले ॥ ३४ ॥ गरूडास्त्र तें राम सोडी भडाडां । नभी चालिली पक्षिकळे झडाडां ।। तिहीं तोडिली सर्प कूळे तडाडां । कपी गर्जती नामघोष घडाडां ।। ३५ ।। पुढे रावणे सोडिली ती अचाटें । नभी चालली थोर गंधर्वथाटें || भुमी पाय आकाशपयर्थी शिशाळे । बहू भार ते धावले येकवेळे ।। ३६ ॥ निवारावया राम तो ते चि सोडी । नभामाजि ते अस्त्र अस्त्रासि तोडी ।। रणी रावण थोर क्रोधाग्नि ज्वाळा । रूपे जाहला थोर कर्कोट काळा ॥ ३७॥ शरा अस्त्र ते सोडिले लंकनाथें । बहूसाल वर्षाव केला अनथें ।। महासिंह नानापरी सर्प जैसे । महामत्त व्याघ्रापरी बाण तैसे ।। ३८ ।। वजाअस्त्र सोडनि रोजीवनेत्रे । असंभाव्य ती चालिली वजअस्त्रे ।। तिहीं सर्व ही बाण छेदून नेले । कपी वीर ते थोर आनंदवीले ।। ३९ ॥ तया रावणा कोप पोटी भडाडी । कडाडीत कोपे रणी बाण सोडी ॥ अकस्मात तो त्यावरी स्पर्श जाला । गडाडीत मेघापरी शब्द केला ।। ४० ।। रथारूढ जाला रणी लंकनाथू । पदी चालतो रामराजा समयूँ ।। नभी देव ते देखवेना तयांला । रथू मौतली शीघ्र तो पाठवीला ।। ४१ ॥ बहू शस्त्र मंडीत रत्नी विराजे । परी अंतकातुल्य तो राम साजे ।। नभी दुंदुभी घोष आकाश गाजे । तया रावणा अंतरीं क्रोध माजे ॥ १२ ॥ पुढे बोलता जाहला घोर वाणी । तुला साह्य जाला रणी वनपाणी ।। उभा रे रिपू खोळितो आजि बाणी । तुशी झुंजतां थोर वाटे शिरॊणी ।। ४३ ॥ तुझा बंधु म्यां पाडिला एकवेळां । रणामाज त्या देखिले त्वां चि डोळां ।। तयासारखे तूज मारीन आतां । पतंगापरी जाळितों जातजातां ॥४४॥ १८. पन्नगास्त्र-सपास्त्र. १९. शिसाळे मस्तकें. २० कर्कोट= सर्प. २१. राजीव नेत्रकमलनयन. २२. मातली-इंद्राचा सारथी. २३, अंतक-यम. २४. दुंदुभो नमारा. २५. जपाणी इंद्र. २६ शिराणी आवड,