Jump to content

पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वरे पाठशालासी बहू दूररताने । मुखे बाजातालागि के पणे मारती वरा शोध जावें । सूखे वाणमूखापस श्रीरामदासकृत उडाला नभामाजे तो लागवेगे । बळे जातसे मारुती व्योममार्गे ।। ९५ ॥ कपी लागवेगे बळें जात आहे | मही मंडळी तेज हेलावताहे ॥ अयोध्यापुरीमाजि रामा जाने । कपी भेदिला पाडिला एक बाणे ।। ९६ ।। मुखी रामनामावळी बोलताहे । महावीर तो त्यास येऊन पाहे ।। झणे कोण तूं सांग आम्हां कपी रे । बहूसाल तूं दीससी साक्षपारे । ९७ ।। मुखी रामनामे सखा वाटतोसी । विरा कोण तूं कोठपर्यंत जाशी ।। ह्मणे मारुती वोखटे थोर जाले । सुमित्रासुतालागि देहांत आले ।। ९८ ॥ समाचार सांगीतला मारुताने । मुखे बोलिले शीघ्र रामानुजाने ।। कपी कष्टलासी बहू दूर जातां । सुखे बाणमखावरी बैस आतां ॥ ९९ ।। त्वरें पाठवीतो विरा शीत्र जावे । पुढे राहिले कार्य xवेगी करावे ।। ह्मणे मारुती हे कदाहि घडेना | उडाला नभी लंघितो देशनाना ।। १०० ॥ त्रिकूटाचळी राम तो वाट पाहे । विरवीर तो सर्व ही बैसला हे ॥ अवस्था बहू लागली आवरेना । बह रात्र जाली कपी कां दिसेना ॥ १०१॥ बहू राम तेथे उतावेळ जाला । अकस्मात तो मारुती शीघ्र आला ॥ कपी सर्व आनंदले गर्जताती । प्रभूलागि सांगावया शीघ्र जाती ॥ १०२॥ मनी चितिले शीघ्र हातासि आलें । तयासारिखें तें समस्तांसि जाले ॥ सुषेणे रसू काढिला औषधींचा । क्षतामाजि तो वोतिला अमृताचा ॥ १०३ ॥ सुमित्रासुतालागि आरोग्य जाले । समस्ती विरी मारुता गौरवीले ॥ त्वरे ऊठिला वीर सौमित्रबाहो । रघूनायके देखिला दिव्य देहो ॥ १०४ ।। कपी राम सौमित्र मेळा मिळाला | गिरी मारुती शीघ्र ठेवून आला ।। पुन्हां मागती भेटती एकमेकां । तया देखतां सूख जाले अनेकां ॥ १०५ ।। कथा ऐकतां नासते कार्य होते । महा विघ्न ते भग्न होऊनि जाते ।। सुखानंद आनंद नानाविलासी । अखंडीत हे प्राचिती रामदासी ।। १०६ ।। प्रसंग नववा. ह्मणे वीर सौमित्र स्वामी समर्या । बळे तोडिने योर चत्वारि चिंता ।। सुरेशासि ह्या मुक्त आधी करावें । अरिधीतया राज्य हे शीघ्र द्यावें ॥ १ ॥ कपीरीज हा राज्य त्यागोनि आला | कपीशी पन्हा पाहिजे शीव गेला । प्रभो नीजबंधूस त्या भेट द्यावी । अयोध्यापुरी सर्व सूखी करावी ।। २॥ ५९, रामानुज रामाचा धाकटा भाऊ भरत. x, वेगीं करावें-सिद्धीस न्यावे. ६०. सुषे-रामाच्या वैद्याचें नांव. ६१. सरेश इंद्र. ६२. अरिभ्राता-बिभीषण. ६३. कपीराजसुनीब. ६१. निजबंधु आपला भाऊ भरत.