Jump to content

पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

युद्धकांड. सुमित्रासुताचा देहे स्वस्थ जाला । पुढे राघवे वैद्य पाचारवीला ॥ मुखे बोलिला राम तो वीर बाहो । करावा अतीआदरें दिव्य देहो।। ७४ ॥ रणी इंद्रजीतासि प्राणांत जाले । कपीऋषभाने सवे शीर नेले || निचेष्टीत काया रणी स्तब्ध ठेली । प्रिये लागि सांगावया भून गेली ॥ ७५ ।। त्रिकूटाचळी भूवने रावणाची । तया सारिखी रम्य नीकुंबळेची ।। तया भूवनामाजि सुलोचना ती । सुख वैभवाची बरी वेळ जाती ।। ७६ ॥ अकस्मात तेथे ध्वनी घोष जाला | परीचौरिका सांगती भूज आला | भुमो रम्य रोजांगणे पांच बंदी । पडे भूज तेथे नवे रक्तबिंदी ।। ७७ ॥ मनामाजि ते शंकली दिव्य बाळा । रणामाजि भैौर त्या कोण वेळा ॥ भ्रमे चित्त दुश्चित्त बाहेर आली । फैणाचेपरी भूज ते ओळखीली ।। ७८ ॥ खुणे दाविले लीहिले पत्र हाते । म्हणे चालिलो मी पुढे मुक्तिपंथें ॥ तुझ्या कारणे धाडिली मेळ बाहे । प्रिये चाल वेगीं तुझी वाट पाहे ।। ७९॥ तया वाचितां थोर आकांत जाला । दुखा माजि तो सौख्यसिंधू बुडाला ॥ मनी वैभवाची तिने सांडि केली । त्रिकूटाचळा जावया सिद्ध जाली ॥८॥ बहू पूतळ्या पिंजरे पक्षियाती । तये भोवती भोवती रूदताती ॥ अहो माय आम्हांसि सांडून जाशी । तुझ्या वेगळी सर्व आम्ही विदेशी ॥८॥ तयांलागि संबोखिले रम्य वाणी | तुम्हां रक्षिता देव तो शूळपाणी ॥ मिळाले बहू लोक ते दाटि जाली । शिबीके मधे भूज वेगे निघाली ॥ ८२ ।। विसोरे बहू साल नानापरीचे । अलंकार भांगार ते सुंदरीचे ।। धनें संपदा पहातां मीति नाहीं । तिने वांटिले लूटिले सर्व कांहीं ।। ८३ ॥ पुढे आश्वनी लागि आरूढ जाली । बह वेग लंकापुरी माजि गेली ॥ नमस्कार केला तया रावणाला । पुढें टाकिले पत्र आकांत जाला ।।८४ ॥ रणी झुंजतां इंद्रजीतू निमाला । बहू नायकांचा ध्वनी घोष झाला || दुखें व्याप्त लंकापती आंग घाली । नसेp मानसीं शुद्धि सबै उडाली।। ८५ ॥ प्रधानी बहूतां परी सांवरीला । पुढे रावणा कोप तात्काळ आला ॥ म्हणे आजि संहारितों वरियांला । दळेशी रणी जावया सिद्ध जाला ।। ८६ ॥ ११. परिचारिका दासो. ९२. राजांगण-मुख्य अंगण. याप्रमाणे च राजमार्ग, राय आंपळा ( राजामलक ), राजजबुवृक्ष यांचा अर्थ समजावा. ९३. रक्तबिंदी रक्ताच्या बिंदूनी. 0. ते शंकली-वोसावली. ९४. दिव्य बाळा सुंदर स्त्री. १५. भतार नवरा. ९६. फणीचे परी सापासारखा गोंडस भुज. ९७. मूळ=बलावणे, आमंत्रण. ९८. पुतळ्या-चित्रे. ९९. विदेशी-परकोदशी. १००. संबोखिले समजाविलें. १. शळपाणी-त्रिशूळ आहे हातों ज्याच्या असा शिव, २. शिबिका पालखी. ३. भांगार-सोनें. १, अश्विनी-घोडी. pa मानसीं-शरीरों..