Jump to content

पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

युद्धकांड. पुढे घोर रुद्रास्त्र त्या रावणीनें । बळें सोडिले शीघ्र माहाविराने ।। रणामानि ते चालिले एकवेळे । भुमी पाय आकाश पंथीं शिसाळे ।। ४५ ॥ बळे धाविले ते रणामाजि कैसे । गिळाया भुगोळा महाविघ्न जैसे ।। तया देखतां कंप माहाविरांसी । भये मर्छना पावली वानरांसी ।। ४६ ॥ तया देखता तो फणी सिद्ध जाला | पुढे सोडिले शीघ्र माहेश्वराला ।। उठे मातला काळ कल्पांत काळीं । दिशा दाटल्या सर्व आकाश ज्वाळी ।। ४७ ॥ रखी कोटि विद्युल्लता एक वेळां । रणी धांवती कंप जाला भुगोळा ।। महातेज हेलावले ते चि काळीं । असंभाव्य तें चालिले ब्रह्मगोळी ।। ४८ ।। तया देखतां अस्त्र मागे पळाले । बहू कुळ ते खेचरांचे जळाले ॥ पुढे देखतां रावणी भ्रांत जाला । भये भूलला वारवेना तयाला ॥ १९॥ मनी भावितो कोण राखेल गेलो । कळेना मला व्यर्थ येथे जळालो ।। तयीं शीघ्र रामानुजे काय केले । प्रतिज्ञापणाला मनी आठवीले ॥ ५० ॥ म्हणे हो मनी शीर छेदूनि न्यावें । म्हणोनी बळे अस्त्र मागे वळावें ।। रणामंडळामाजि वीरें सुमित्रे । बळे वारिले अस्त्र ते बीजमंत्रे ॥ ५५ ॥ म्हणे मेघनादू मला विघ्न आलें । परी थोर आश्चर्य का वाचवीलें ॥ भला वीर सौमित्र हा वीर्यवंतू । मना सारिखें युद्ध मोठे करीतू ॥ ५२ ।। असेना पुढे वीर होणार नाहीं । बहू देखिले पाहिले झुंजतां ही ॥ महावीर हे सूर्यवंशी बळाचे । रिपूलागि रक्षावया कोण कैचे ॥ ५३ ।। महावीर दोघे रणी ते चि काळे । पुन्हा सोडिते जाहले बाणजाळे ।। रणामाजि ते भेदिती एकमेकां । नभी सोडिल्या बाणभाळी अनेका ॥ ५४ ।। रिपूची रिपू तोडिती बाणजाळे । पुन्हा मागुती सोडिती ते उफाळें ।। विरें वीर तो भेदितां ही ढळेना । विरश्रीबळे काय होते कळेना ।। ५५ ।। पुढे काय केले तया मेघनादे। रणी हाक देऊनि धांवोनि क्रोधे ।। महातेज पुंजाळ त्या शीघ्र काळी | बळे भेदिल्या तीन भाळी कपाळी ।। ५६ ॥ महावीर तो रावणी काळरूपी । पुराणा बहू काळ कापट्य रूपी ।। समित्रासुतू तो दिसे बाळलीला । बळे भेदिला रक्त वाहे कपाळा ।। ५७ ।। तया देखतां कोप नैऋत्यनाथा । षढे चालिला पाववायासि वेया ।। रणी हाक देऊनि बीभीषणाने । गदा घेतली चालिला थोर त्रोणे ।। ५८ ॥ तया देखतां त्या दशग्रीवसूते । रणी विधिला पाडिला बाणघाते ॥ ७८, शिसाळ-मस्तक. ७९. माहेश्वररुद्रास्त्र. ८०. भाळी-समूह. ८१ वेथा व्यथा, दुःख. ८२. त्राण-नेट.