Jump to content

पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीरामदासकृत समस्तांमध्ये रावणे भ्रष्टवीला | तुम्हां मर्कटां माजि तो श्रेष्ठ केला ॥ ५ ॥ बळे आपुल्या रे तुझे पादपाणी । नभामाजि खंडून धाडीन बाणी ।। समस्तां तुम्हां ठाउकी शक्ति माजी । रहाया पुढे काय रे प्राप्ति तूझी ॥ ६ ॥ बहू बोलिला वजिटू घोर शत्रू । प्रती उत्तरे बोलिला तो सुमित् ।। मि हा कोण तूं नेणशी काय मूढा । वृथा विक्रम बोलशी वाढ पूढांd ।। ७ ।। मही रुंद विस्तीर्ण छपन्न कोटी । गिरी दिग्गजांची असंभाव्य दाटी ।। तटाके नद्या मातले भव्यसिंधू । वरी दाटली जीवसृष्टी अगाधू ।। ८ ।। असंभाव्य हा भार कोणा धरेना । न घेतां पुढे जीव सृष्टी उरेना ।। सहस्रांफणींचा असंभाव्य व्याळू । तयांमाजि येके फणी हा भुगोळू ।। ९॥ खंभावे शिरी ठेविजे पुष्प जैसें । तयाचे परी घेतले विश्व तैसें ।। तयाहून तो कोण आहे विशेषू । मुढा नेणशी को स्वये मी च शेषू ।। १० ।। भविष्योत्तरे सर्व ही सत्य व्हावी | बळे वैभवे राक्षसांची दिसावी ।। म्हणूनी तुवां घेतलें येश युद्धी | नभामाजि जाऊनि कापट्य बुद्धी ।। ११ ॥ ननी हीन त्याला बरी वेळ आली । अकस्मात ते कीर्ति होऊनि गेली ।। बळे आगळा राम आत्मा जगाचा | तयाहूनि रे विक्रम कोण कैंचा ।। १२ ॥ तुम्हां पापरूपांमध्ये भक्त एकू । महावीर बीभीषणू पुण्यश्लोकूँ ।। तयाशी सभामंडपी गर्व केला । दिसेंदिस राक्षस सर्वे बुडाला ।। १३ ।। रिपू बोलतो जाण रे सत्य वाणी । प्रतापे तुझे शीर छेदीन बाणी ।। तया बोलितां ताविली भीम' दृष्टी । उभा काळ जाळावया जीवसृष्टी ।। १४ ।। बळे छेदिता जाहला वोष्ट दंती । सिमा फांकली वैभवाची दिगंती ।। करारां रणी खादल्या बजदाढा । शतें सोडिली बाण वोदनि मेौं ।। १५ ।। बळे धांविली बाणजाळे उफाळे । लखाखीत सौदामिनीचेनि मेळे ।। तडाडीत घोषे कडाडीत आले । सुमित्रासुते सर्व छेदून नेले ।। १६ ।। १९. पादपाणी हातपाय. c. प्राप्ति-शक्तो. ५०. वाजट=बडबड्या. ५१. सुमित्रसमित्रेचा मुलगा लक्ष्मण. ५२. विकमपराक्रम. ५३. वाड-पुष्कळ, d. पुढा-गाढा. ५४. छपन्नकोटी (योजनें ) हा पृथ्वीचा विस्तार प्राचीन समजतीप्रमाणे आहे. अवाचीन काळी भगोलव्यासमान ८००० मैल म्ह० ८०० योजनें, परिघ २५००० मैल म्ह० २५०० योजनें, आणि पृष्ठफल २०००००००० वीस कोट मैल म्हणजे २ कोट योजनें आहे. तसेच पृथ्वीचे घन २७००००००००००० दोन निखर्व सात खर्व मैल म्ह० २ खर्व व सात अब्ज योजनें आहे. ५५. गिरी-डोंगर. ५६. सिंधु समुद्र. ५७. फणी फडा. ५८. व्याल साप. ५९. स्वभावे सहज. e. 'तुज' पा० भे०. ६०. पण्यश्लोक पवित्र आहे कीर्ति ज्याची असा. ६१. भीम भयंकर. ६२. मेढा तीरकमटा. ६३. सौदामिनी वीज. f. सेप्रेरिले दूत काळे' पा० मे..