________________
युदकांड. (४७) महाशोक आरंभिला त्या कपीने । म्हणे काय केले जंगज्जननीने ॥ ३९॥ बहू दुःख मागील ते आठविले । उदासीन हे चित्त दुश्चीत जाले ॥ म्हणे काय सांगो तया राघवाला । कपी मारुती शोकसिंधू बुडाला ॥ ४० ॥ म्हणे रे कपाळा असे काय केले । बहू थोर हे पाप माझे उदेले ।। न सांगो तरी गोष्टी राहों नये की । पुढे सांगतां राघवा दुःख हे कीं ॥ ४१ ॥ प्रवाहो बळे चालिला अश्रुपाती । विलापे करूं लागला तो रुदंती ।। बळे ऊठला चालता चालवेना । रघूनायका भेटला दैन्यवाणा ॥ ४२ ॥ अधोमख पाहोनि कांहीं वदेना । दुखे दाटला कंठ त्या बोलवेना ॥ म्हणे जानकीसारिखी शस्त्रघाते । रणी मारली राक्षसे इंद्रजीतें ॥ ४३ ॥ तये सांगतां मांडला शोक रामे | मिळाली दळे दैन्यवाणी विराम ।। कपीवाहिनामाजि आकांत नाला सुमित्रासुते राम तो शांत केला ॥ ४४ ॥ भविष्योत्तरें वाल्मिकी सत्य व्हावी । देहसोंगसंपादणी का करावी ॥ म्हणनी रघनायके शोक केला । तंव बीर बीभीषण शीघ्र आला ॥१५॥ म्हणे जी प्रभू शोक वांयां करीतां । असे सत्य नेमस्त कल्याण सीता ।। अशोकावना दूत म्यां पाठविले । प्रसंगी समाचार घेऊनि आले ॥ १६ ॥ तया इंद्र जीतें रणी भाव केली । नव्हे सत्य हे मिथ्य होऊनि गेली ॥ पुरी होम आरंभिला मेघनादें । पुरा जालिया कोण घेईल "द्वंदें ।। ४७ ॥ तया इंद्रजीतासी आधी वधावें । वृथा शोक सांडूनियां सिद्ध व्हावे । परा होम हो जालिया आवरेना । समारंगणी मारितां ही मरेना ।। ४८ ॥ प्रभू जाहली ऑश्रिणी व्योमपंथे । वधावा सुमित्रासुताचेनि हातें ॥ तये सांगतां सर्व आनंद जाला । बहूतांपरी राघवे गौरविला || ४९॥ पुढे राघवाची बहू स्तूति केली । विरांची असंभाव्य मांदी" मिळाली ॥ सभामंडळी ते कपी रीस राजे । तयामध्यभागी महावीर साने ॥ ५० ॥ समस्ताशी सोडीलसे इंद्र भावी | समर्था तया ऊपमा काय द्यावी ॥ असा राम हा देव ब्रह्मादिकांचा । समित्रासुतासी वदे रम्य वाचा ॥ ५१ ॥ म्हणे होम आरंभला इंद्रजीते । मुखें बोलिले सत्य नैऋत्यनाथें । पुरा होम होतां कदां आंवरेना । समारंगणी मारितां ही मरेना ॥ ५२ ॥ प्रताप समारंगणी त्या वधावे बळे भाजि ब्रह्मादिकां सौख्य द्यावें ।। पढे ऊठिला शीव सौमित्र कैसा । नभोमंडळी तीव्र आदित्य जैसा ॥ ५३ ।। ११. जगज्जननी जगन्माता सीता. १५. माव-कपट. १६. ढूंद-युद्ध. १७. अश्रि. णी अशरीरिणी आकाशवाणी. १८. व्योम आकाश. १९. मांदी-मेळा. २०.क्र. स्यनाथ-राक्षस (बिभीषण). २१. आदित्य सूर्य.