Jump to content

पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीरामदासकृत बह कोपला चालिला वीर जेठी । प्रतापे म्हणे सर्व जाळीन सृष्टी । पुढे बापुडी वानरे दैन्यवाणी । खिळी तो बळे सर्व ब्रह्मांड बाणीं ॥ २४ ॥ पित्याकारणे वीरभद्रू निघाला । तयां दैत्यजांला धरूं सिद्ध झाला ।। तयाचे परी कोपला काळरूपी | बळे चालिला शकशत्रु प्रतापी ॥ २५ ॥ तुरे वाजती नाद गेला भुगोळा | दळेशी वळे पावला होमशाळा ॥ तया राक्षसे मागुती होम केला । महावीर मेघासनी गुप्त झाला ॥ २६ ॥ बळे बूजिले सर्व आकाश बाणीं । पडो लागली वानरें दैन्य वाणी ।। कपी-वाहिनी" माजि आकांत जाला | पुन्हा मागुता थोर कल्पांत आला ॥ २७ ॥ वरी पाहतां युद्ध कर्ता दिसेना । धडाडा पडो लागली सर्व सेना ।। महावीर ते घोर मागे पळाले । पळाले कपी राघवा आड गेले ॥ २८ ॥ म्हणे राम तो सुनिवा मारुता हो । नभोमंडळी युद्धकर्ता पहा हो ।। प्रतापें बळे वीर सप्तै उडाले | असंभाव्य ते पोकळी माजि गेले ।। २९ ॥ महा थोर ते युद्धसामर्थ्य गेले । तया इंद्रजीते पुढे काय केले ॥ अकस्मात तो भूतळा माजि आला । रणामंडळी सैन्यसिंधू मिळाला ॥ ३० ॥ खटाटोपिले ते बहू शस्त्रपाणी । रूपे कर्कशे काळ कर्कोटबाणी ।। बळे चालिला भार वेष्टीत सेना । रजे मातला व्योम पूढे दिसेना ।। ३१ ॥ कपी वीर राक्षेस सन्मूख जाले । समारंगणा माजि युद्धा निघाले ।। पुढे राक्षसे रूप केले सितेचे । महा रम्य लावण्य तें जानकीचे ॥ ३२ ॥ रणी लोटल्या वीर राक्षेस फोजा । कपीभार ऊठावले स्वामिकाजा ।। दळी राक्षसांचे बळी इंद्रजीतू | बळी चालिला काळ जैसा कृतांतू ॥ ३३ ॥ तया देखतां धांवला रुद्र तैसा । करी घेतला शैल ब्रह्मांड जैसा ।। बळे इंद्रजीता उजू धांव घाली । तयों इंद्रजीते सिता दाखवीली ॥ ३४ ॥ म्हणे रे कपी हे सिता राघवाची । गुणी स्वामिणी हे तुम्हां मर्कटांची ॥ महापापिणी सर्पिणी दुःखदाती त्रिकूटाचळी राक्षसी कूळहंती ॥ ३५ ॥ अशोकावनामानि हे शोकवल्ली । अकस्मात कोठून निर्माण झाली ।। तया दीवसापासुनी दुःख झाले । त्रिकूटाचळा थोर दारिद्रय आले ।। ३६ ॥ बळाचे बहू वीर हे पापिणीने । सखे आमुचे ग्रासिले सर्पिणाने ।। केळी मांडला त्यास हे मूळ सीता | करीतो इचा शीघ्र संहार आतां ॥ ३७ ।। तया राक्षसे मारिले जानकीला ॥ म्हणे रे कपी सांग त्या राघवाला ॥ समारंगणी शीर छेदनि नेले । तया राक्षसे शीघ्र गंतव्य केलें ॥ ३८ ॥ सिता देखता मारुती अंग घाली । प्रसंगी तिये मर्छना शीघ्र आली ।। १०.शकशत्रु-इंद्राजत. ११. वाहिनी-फौज. १२. तांत-यम. १३. कळी भांडण.