________________
युद्धकोड. (४५) बळी दक्ष वित्पन्न चातुर्य जाणे । तया देखतां अंतरीं सूख बाणे ।। प्रसंगें चि तो वीर युद्धासि गेला । प्रहस्तू रणी युद्ध होतां निमाला ॥ ९ ॥ तयाचा बहू क्रोध आम्हांसि आला । रिपू राम जिंकावया वेग केला ॥ तयाचे महां युद्ध ते काय बोलो । समारंगणी भ्रष्टलो भग्न जालो ॥ १० ॥ तया ऊपरी धार आम्हां धरेना । पुढे ऊठवीले बळें कुंभकर्णा ॥ तया सारिखा कोण आहे बळाचा । समारंगणी धीर काळासि कैंचा ॥ ११ ॥ महा वीर तो घोर युद्धासि गेला । रिसां वानरां योर संहार केला ॥ रिपूने तया शेवटी बाण-घाते । समारंगणी धाडिला मृत्युपंथे ॥ १२ ॥ प्रतापी सखा बंधु माझा निमाला । बळे आगळा थोर आधार गेला ।। मला पूसिल्यावीण गंतव्य केले । नये बोलतां दुःख ब्रह्मांड जाले ॥ १३ ॥ तया ऊपरी चौघ ही सूत माझे । अगा इंद्रजीता सखे बंधु तूझे ।। तयांच्या प्रतापानळे सूख लोटे | समारंगणी भीडतां काळ वीटे ॥ १४ ॥ नरा अंतकाला नरा अंतकाने । बळे पीटिले देवदेवांतकाने ॥ तळी घातले सर्व त्या त्रीशिराने । रणीं वानरी घेतले सर्व प्राणे ॥ १५ ॥ अतीकाय तो वीर मेरू बळाचा । प्रतापे बळे आगळा विक्रमाचा । रथारूढ होऊनि युद्धासि गेला । तयाचा सुमित्रासुतें घात केला ॥ १६ ॥ निमाले सखे दुःख ऊदंड जाले । पुढे पाहतां वीर सामर्थ्य गेले ॥ महा वीर ते मृत्युपंथें चि जाती । नरें वानरे बापुडी येश घेती ।। १७ ॥ निमाले सखे सूत बंधू बळाचे । प्रतापें सुरांहूनि ते विक्रमाचे ।। रणामंडळी सर्व सेना निमाली । बहूसाल संहारिली कूळवल्ली ॥ १८ ॥ अगा इंद्रजीता तुवां सूख द्यावे । प्रतापें रणी सर्व शत्रू वधावे ।। मला सांगसी लाविले मृत्यु-पंथीं । परी मागुती ते रिपू गर्जताती ।। १९ ।। रिपू ऊठती मागुती हे न व्हावें । बळे सर्व निर्मूळ त्यांचे करावे ।। प्रतापे रणी सर्व पाडून येसी । परी मागुता जीव येतो तयांशी ॥ २० ॥ बहूवेळ ती युद्ध सामर्थ्य केले । परी पाहतां सर्व ही व्यर्थ गेले ।। प्रतापेरणी पाडिले बाण-घाती । समारंगणी मागुते सिद्ध होती ॥ २१ ॥ महीमंडळी नाम त्यांचे नसावे । विरा विक्रमे त्वां मला सौख्य द्यावें ।। पिता बोलतां धीर पोटी धरेना | असंभाव्य कोपानळू सांवरेना ।। २२ ।। उभा राहिला वाक्य बोले पित्याशी । म्हणे शीघ्र संहारितो वैरियांशी ।। समारंगणा माजि ऐसे न होतां । तरी जाणिजे भेटि ते हे चि आतां ।। २३ ।। ५. युद्ध होतां घोर मारें (पाठ). ६. बळे आगळा=शुळीहून तो (पाठ). ७. विक्रम पराक्रम. ८. गर्जताती ऊठताती (पाठ).* तांत्वां. ९. पाडिले मारिसी.