________________
युद्धकांड. (४३) रणी राक्षसां थोर संहार जाला । समाचार गेला तया रावणाला || ८८ पुढे रावणाने बहू दुःख केले । नसे अंतरीं सौख्य टाकून गेले ॥ दशग्रीव बोले विरा इंद्रजीता । प्रतापें रणा माजि तूं जाय आतां ॥ ८९ ॥ रिसां वानरांची असंभाव्य सेना | तुज वेगळी सर्व संहारवेना ॥ उभा राहिला शीघ्र ऊदीत जाला । म्हणे० शीघ्र संहारितो वैरियांला ॥ ९ ॥ दळे चालिली राक्षसांची अचाटें । पुढें वीनिती भाँट वैताळ थाटे ।। बळी *रावणी तो रथारूढ जाला । बहूसाल वायें दळेशी निघाला ९१ ॥ रणा माजि येवोनियां होम केला । महा भीम कृत्या रथ प्राप्त जाला ॥ . रथारूढ होऊनि वेगी उडाला । नभोमंडळा माजि तो गुप्त जाला ॥ ९२ ।। असंसाव्य ती मोकळी बाण-जाळे । बळें धांवती प्रेरिले दूत काळे ।। कपींची तुटो लागली कंठ-नाळे । रणी लोटती वीर-प्रेते सुकाळें ॥ ९३ ।। असंभाव्य सामर्थ्य त्या रावणीचे । कळेना कळा कोण कापट्य याचें ॥ कदां नेणती बापुडे देव कांहीं । रणी पाडितो वीर सन्मूख नाहीं ॥ ९४ ॥ बह खोचली ते असंभाव्य सेना । दिशा दाटल्या बाण-जाळी दिसेना ॥ कपी-वाहिनी मानि आकांत जाला । पुढे मारुतीचा पिता शीघ्र आला ॥ ९५ ।। निरूपी अती आदरे राघवाशी । म्हणे अंगिराअ-स्त्र योजी त्वरेशी ॥ पढे राम तात्काळ ते अस्त्र घाली । तेणे तूटले शीर कृत्या निमाली ॥ ९६ ।। पुढे रावणी भूतळा माजि आला । रणामंडळी मृत्यु जैसा उदेला ।। भयासर तो वीर घोर प्रतापी | शरा सोडिता नाहला काळ-रूपी ॥ ९७ ॥ समस्ती अकस्मात तो देखियेला । तया एक वेळा बहू मार केला ॥ कपी वीर ऊठावले शीव काळे । शिळा शीखरे टाकिती बाण-जाळें ॥ ९८॥ रणी रावणी येकला वीर नेठी । कपी लोटले लक्ष कोट्यानुकोटी ।। रिसी वानरी थोर कल्लोळ केला | बळे ताडिते नाहले राक्षसाला ॥ ९९ ॥ बळे फेकिला शूळ त्या मारुताने । गदा घेतली शीघ्र बीभीषणाने । परीघाशी घेऊनियां शीघ्र धावे । कमद करी वेग नेटें उठावे ॥१०० ॥ कपी:ऋषभा थोर आवेश आला । शैतनीस घेऊनि सन्मुख जाला ॥ द्विवीदे बळे सोडिले चक्र कैसें । महा पर्वती चालिले बज जैसे ॥ १०१ ॥ मुगधे विरें ताडिला शस्त्र-घाते । गिरी-शंग तो टाकिला जांबुवंते ॥ शिळा टाकिली चंड त्या अंगदाने । महा खड ते मोकलीले नळाने ॥ १०९॥ बहूसाल वाडे दळेशों निघाला. ०५. वानिती वर्णितो. ७६. भाट स्तुतिपाठक. ७०. घेताळ भाट. * रावणी-इंद्रजित. ७८. मोकली=सोटी. ०९. परिघ शस्त्रविशेष. ८०. ऋषभ श्रेष्ठ. ८१. शतघ्नी तोफ.