Jump to content

पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३०) श्रीरामदासकृत पुन्हा रावण कोपला काळ रूपी । विरां राक्षसां माजे चंड प्रतापी ।। ६ ।। दहा मस्तकी त्या दहा दिव्य छत्रे । पताका बहू मर्त्यल मतिंड-पत्रे ।। महां वैभवेशी रथा रूढ जाला । तया मागुती थोर आवशु आला ।। ७ ।। बहू बाण मुंबाड वाहोनि पृष्टी । दहा ही धनुष्ये करी दृढ मुष्टी ।। करूं लागला मागुती बाण वृष्टी । रघूनायक दोखले त्याशिं दृष्टी ।। ८ ॥ उभा राहिला राम वनांग ठाणे । करी सज्जिले चाप चंद्रार्ध-बाणे ।। दहा हेम मूगूट छत्रे धनुष्ये । बळे तोडिली पाडिली ती निमेषे ॥ ९ ॥ पुढे रावणू तो भयातूर जाला । बहूतां परी राघवें शीकवीला ।। म्हणे जाई रे रक्षिले आजि तूला । रिपू प्राण घेऊनि तैसा पळाला ।। १० ॥ महा मेघनादू असे नाम ज्यासी । पळे लंकनाथा सवे तो त्वरेशी ।। तया सारिखी मूढ मूढे मिळाली । रणी भ्रष्टली सर्व मागे पळाली ॥ ११ ॥ न पाहात मागे पुरी माजि गेले । विरां माजि कोणी कुणासी न बोले ।। पुढे सर्व ही मंडपा माजि आलेd | समस्तांशि तो रावण काय बोले ।। १२ ।। भयातूर लंकापती दैन्य वाणा । म्हणे ऊठवा हो बळे कंभकर्णा ।। तया वीण आणीक कोणी दिसेना । रिपू घोर हा थोर संहारवेना ।। २३ ।। पुढे धाडिले शीघ माहोदराला । महा घोर वाद्ये दळे सिद्ध जाला || कितीएक ते धीट मोठे? पळाले । कितीएक पोटी भयातूर जाले ।। १४ ।। निजेला दरी भीतरी कुंभकर्पू । दिसे hकाळ विक्राळ तो मेघवर्ण ।। शरीरें भयासूर हा घोर रूपी । विरा भासला मृत्यु येमस्वरूपी ।। १५ ।। तया ऊठवीतां भयातूर जाले । महा वीर ते कंप अंगी उदेले ।। पुढे जाहले धीट ते नेट पार्ट । उभी पाहती सर्व नैऋत्य थाटें ॥ १६ ॥ बहूसाल वाद्ये बहूतां परीची । महा कर्कशे चंड घोर ध्वनोची ।। तयाच्या पुढे जाहला एक वेळा । नभोमंडळी नाद गेला भुगोळा ॥ १७ ॥ गदा तोमरे हाणती वज घाते । महा मार आरंभिला राक्षसाते ।। कळा लाविती टाकिती वृक्ष नाना । गळाले परी कुंभकर्ण उठेना ।। १८ ।। शिळा टाकिती टोचिती शूळ शस्त्रे । महा घोष संपूर्ण तो कर्ण पात्रे ।। बळे लोटले मस्त ते हस्ति वेगीं। शरीरावरी चालती ते प्रसंगी ॥ १९ ॥ विरा ऊठवाया बहू यत्न केला | परी नूठतां सर्वही व्यर्थ गेला || b. पुढे ' पा० भे०. ११ मत्स्य-मासा. c. 'दिव्य' पा. भे०. ४२. मार्तड-सूय. १३. हेमसोने. 28. निमेष अत्यल्प काळ. d. गेले' पा० भे०. e. — नीवारवेना' पा० भे०. f. दळेशी निघाला' पा. भे०. g. 'मागें 'पाभे०. h. 'वीर' पा० भे.. ' १५ मैकत्यथाटनाक्षसमंडळो. १६. तोमर शस्त्रविशेष.