________________
युद्धकांड, (२५) कपी कोपले गर्जती युद्ध-काळी । शिळा टाकिती पाडिती दुर्ग-पोळी ।। गिरी हाणिती थोर नेटे धडाडी । बळे लागतां दिव्य लंका घडाडी ।। ३४ ॥ त्रिकूटावळी लोटली सर्व सेना । असंभाव्य ते भार लंका दिसेना ।। कपी क्षोभले गर्जती काळ जैसे । दळेशी बळे धांवती वीर तैसे ।। ३५ ॥ दळे पायिंची थोरh अश्वा गजांची । रणी चालिली दाट थाटे रथांची ।। बहू भार शंगारिले राक्षसांचे । महा वीर ते घोर नाना परीचे ।। ३६ ।। रणी पातली ते i भयातूर सेना । रजें मातली चंद्र-सूर्यो दिसेना ।। बहू साल वायें बहूतां परीची । महा कर्कशे वाजती राक्षसांची ॥ ३७ ।। समारंगणीं चालिल राजभारे । दळे दाटली वानरांची अपारें ।। बळे हाणिती येकमेकां धबाबां । झरे लागले शोणिताचे थबाबां ।। ३८ ॥ पुढें धांविले पायिंचे शस्त्रधारी । जयां देखतां रोमें आंगीं थरारी ।। कपी राक्षसांते महा मार जाला । तेणे शोणिताचा नदी पूर आला ॥ ३९ ॥ रणी तोडिती वीर वीरां धसासां । भगाडे बह पाडिती ते घसासां ।। बळे टोचिती शूळ पोटीं भसासां । शिरें फोडिती मुष्टि-घातें ठसासां ॥ ४० ॥ पुढे झुंझतां भार तो मृत्यु पावे | करीती बळे वीर मागे उठावे ।। कपी कोपले थोर काळाग्नि जाले । रिपू पायिंचे सर्व ही भग्न केले ॥ ४१ ।। निमाले रणीं देह त्या पार्थिच्यांचे । बळें ऊठले भार त्या उतांचे ।। देहे टाकिती झुंझती स्वामि-काजा । पुढे धांवती वीर मागील फौजा ।। १२ ।। कपी झुझतां भंगल्या अश्व-याती । रणी लोटलीया बळें भेद्रजाती ।। गिरी सारिखे थोर कीकोट घोषे । गजी वानरां त्रासिले हो विशेषे ॥ ४३ ।। कपीराज ते हागिती मत्त हस्ते । बळे झोडिती कुंजरे खस्त व्यस्तै । दळे पायिची अश्व-रत्ने अपारें । रणी पाडिली कुंजरे थोर थोरे ॥ ४ ॥ कळेना महा मार त्या वानरांचा । रथी.) थोर संहार केला गजांचा ।। तया पृष्ठिभागी पुन्हा भार आले । रिपू वनारी सर्व संहार केले ॥ ४५ ।। पढ़ें चालिले भार नाना रयांचे । बहू बाण जाळें कपी-सैन्य खोंचे ।। . रणी धांवती चक्र चाली घडाडां। करी टाकिती चंडशीळा धडाडां ॥ ४६ ।। रथी सारथी सर्व ही चूर्ण केले । महा वीर ते भार मागूनि आले ।। रणी राक्षसांतें क्षयो प्राप्त जाला । जयो वानरां शीघ्र टाकून आला ।। ४७ ।। रणी मारुते पाडिला जंबुमाळी । सुखेणे विदूणा पुढे ते चि काळी ।। __h. · अश्वरत्ने' पा० भे०. i. 'भयासूर' पा० भे०. २३ शोणित-रक्त. २४ रोमकेश, लोम, कांटा. २५. राउत घोडेस्वार. २६ भद्रजाती-हत्ती. २७ कुंजर-हत्ती. j. 'रणी' पा० मे०. k. 'कपो' पा० मे०. 1. 'मागुनी शीन' पा० भे०