________________
(२२) श्रीरामदासकृत मनी माझिये वाटते निश्चयेशी । रघूनायका भेटवावे सितेसी ॥ ८९ ॥ समाचार तो सर्वही श्रूत केला । तया सांगतां रावणा क्रोध आला ।। पुढे राक्षसे शीर केले रिपूचे । वनी चालिला सत्व घ्याया सितेचें ॥ ९० ॥ अशोकी वसे जानकी भूमि-बाळा । वदे रामनामावळी सत्वशीळा ।। पहा रावणे शीर मायीक केले । छळाया सिते कारणे शीघ्र नेलें ।। ९१ ॥ म्हणे रावणू व्यर्थ त्वां धीर केला । रणी दीर भर्तार तूझा निमाला ॥ कपी राक्षसांते महा मार जाला । प्रहस्त जयो शीघ्र घेऊनि आला ।। ९२ ।। रिपू सांगतां ते भयातूर जाली । भये जानकी शोक-सिंधू बुडाली ।। शिरें देखतां मूर्च्छना शीघ्र आली । देहे सांवरेना भुमी अंग घाली ।। ९३ ॥ भविष्योत्तर b बोलिली वाल्मिकाची । म्हणे कायसा बोलिला तो विरची'२ ।। पहा आजि ते सर्व ही व्यर्थ जाले । कृतांतापुढे मश्यका येश आले || ९४ ॥ बहू शोक होतां देहे-भाव सांडी । म्हणे रावणू d सत्त्व सीता न सांडी ।। महा प्रेत्न सायास भ्यां व्यर्य केला | पुढे शीघ्र लंका-पुरी माजि गेला ।। ९५ ।। दळे सिद्ध केली बळे लंकनायें । प्रती-मल्ल राक्षेस चत्वार पंथें ॥ महा वीर ते सर्वही शस्त्रपाणी । बुजू पाहती भूमि आकाश बाणी ।। ९६ ।। कपी-चक्र ते ही बळे सिद्ध नाले । निळे वानरेशी प्रतीमल्ल केले ।। महा वीर ते गर्जती मेघ जैसे | भुतां, खेचरां थोर कल्पांत भासे ।। ९७ ॥ सुवेळाचळा राम पाहे स्वभावें । तया मस्तकी शंग ते दोन गांवे ।। नभी लागला उंच आकाश-पंथें । म्हणे राम गा सुग्रिवा जाइं तेथें ।। ९८ ॥ म्हणे वीर सुग्रीव आज्ञा प्रभूची । असंभाव्य सेना रिसां वानरांची ।। महा वीर तात्काळ सर्वे मिळाले । बळे शृंग वेघावया सिद्ध झाले ।। ९९ ॥ कथे लागि श्रोती पुढे चित्त द्यावे । ह्मणे दास अर्थातरी वीवरावे ।। स्वहीता कयामत घ्यावे फुकाचे । सदां सेवितां दुःखदारिद्र्य कैचें ॥ १० ॥ तृतीय प्रसंग. पुढे चालिला शीघ्र तो राम राजा । कपी धांवती वीर वेष्टीत फौजा ॥ करी हस्त घेऊनि बीभीषणाचा । बळे वेघले शुंग त्या पर्वताचा ॥ १ ॥ कितीएक ते राहिले भार मागें । बळें वेधती शंग तो लागवेगें ॥ पुढे शीघ्र आटोपिले जात जातां । मिळाले कपी राम सौमित्र माथां ॥ २॥ सुवेळागिरी-शीखरी राम पाहे । अती साजिरा त्रीकुटू शोभताहे || सिंधु समुद्र. b. सर्व ही' पा० मे०. १२ विरिंची ब्रह्मा. c. मिध्य' पा. भे.. १३तांत यम. ११ मश्यक धुंगुर्डे. d. 'सत्य' पा. भे..