Jump to content

पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

युद्धकांड (२१) कपी राघवा बाम भागींच आहे | त्रिकूटाचळू दृष्टिने वक पाहे || कपीनाथ सुग्रीव तो ओळखावा | कळेना असंभाव्य त्याचा उठावा ।। ७१ ।। कपी आणिले सर्व भूमंडळींचे । असंख्यात संख्या नसे भार त्यांचे ॥ वनी मैत्रिकी जोडिली राघवाशी । रघूनायका साह्य जाला जिवेसी ।। ७५ ।। सिता शोधिली मारिलें कूमरासी । वने मोडिली नाळिलें त्रीकुटाशी ॥ । बळे आगळा भूपती पैल पाहें । समस्तां मध्ये मारुती शोभताहे ।। ७६ ॥ महा भीस भिंगोळ काळा कराळू । विशाळे नखे फोडितो ब्रह्मगोळू । रिसां कर्कशां माजि हा काळ-केतूं । बळे आगळा पैल जो जांबवंतू ।। ७७ ।। उतावीळ मारावया दैत्य पाहे । महा वीर बीभीषणू शोभताहे || तये सांगतां रावणा दुःख जालें । असंख्यात कोपानळे दग्ध केलें ॥ ७८ ।। करी खंड घेऊनियां सारणाला । प्रसंगी तये शीघ्र मारूं निघाला ॥ म्हणे सारणू जी पिडा कां करीतां । मुखें बोलिलो सर्व ही सत्य वार्ता ॥ ७९ ॥ तुळाया दळे पाठवीले भुपाळे । रिपूची दळे पाहिली ती विशाळे ।। तया सारिखें बोलिलो सत्य भावे । समर्था पुढे मिथ्य कैसें वदावे ।। ८० ॥ प्रभू आमुचा कोण अन्याय जाला । खरे सांगतां कोप येतो तुह्मांला । नसे पाहतां अल्प अन्याय कांहीं । नसे मिथ्य आम्ही नसो स्वामि द्रोही ।। ८१॥ पुढे रावणू कोप सांडून ठेला | पुसे आदरें मंत्र माहोदराला ॥ सुवेळाचळा कोण रे पाठवावा | रिपूचा विवेके बरा शोध घ्यावा ।। ८२ ।। वदे वीरु माहोदरू रावणातें । सुवेळाचळा पाठवा शार्दुलाते ।। महा धूर्त हा जाणतो सर्व मत्ते । बळे शीघ्र तूळील रीपू-दळाते ।। ८३ ॥ पुढें दैत्य बोलाविला आदरेंशी । म्हणे सैन्य पाहोनि यावे त्वरेशी ॥ अलंकार देऊनियां तोषवीला । बळे हेर तो शीघ जाऊनि आला ।। ८४ ।। नमस्कारिला राव तो आदरेशी । म्हणे रावणू म्लान कां दीसतोशी ।। अधोमूख राहोनि शार्दूल बोले । म्हणे हो कपी काळ जैसे उदेले ।। ८५ ।। बहू दाटलीसे असंभाव्य सेना । नसे रीघ तेथे कदां जावयेना ॥ परी मी तयांमाजि तैसाच गेलो । बहू ताडिलो पाडिलों कुस्त केलों ॥ ८६ ।। निरोपे तुझ्या शीघ्र गेलो सुरारी । रुपे जाहलो वानरू वेष-धारी ॥ मला हिंडता हिंडतां थोर माने | पुढे लक्षिले धूर्त बीभीषणाने ।। ८७ ॥ कपी धांवले दूत त्या सुग्रिवाचे । पुरोहीत चत्वारि बीभीषणाचे ।। धरूनी मला चालवीले त्वरेशी । पुढे चालतां देखिले राघवासी ॥ ८ ॥ म्हणे धन्य तो रामराजा दयाळू । मला देखितां शीघ्र सोडी नृपाळू ॥ २ केतु-निशाण, बावटा. १० खड्=तरवार.