Jump to content

पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीरामदासकृत द्वितीय प्रसंग प्रारंभ. समुद्रातिरी राम राजीव-नेत्रे । भुमी सेज दर्भासनी तीन रात्रे ॥ बहूतां परी दधिला श्रेष्ठ मानू । परी सागरू तो नव्हे सुप्रसन्नू ॥ १॥ फळे तोय सांडुनियां नित्य नेमे । बहूतां परी प्रार्थिला सिंधु राम ॥ परी नायके जो बळे धुंद नाला । रघूनायका कोप तात्काळ आला ॥२॥ उभा राहिला काळ कृत्तांतु जैसा | बळे सिंधु जाळावया राम तैसा ।। दिसे रूप अद्भूत वजांग ठाणे । करी चाप ते सज्जिले अग्निबाणे ॥ ३ ॥ बळे ओढितां घोर-घो करारी । दिशा दाटल्या वन्हि शीतें.थरारी ॥ भये बैसला काळ-पोटी दरारा | mचवों लागल्या त्या असंभाव्य तारा ॥४॥ बहू क्षोभला राम जाळू निघाला । पुढे सिंधु भेटावया शीघ्र आला ॥ म्हणे स्वामि हो थोर अन्याय झाला । समुद्रासि हो शीघ्र पालाण घाला ।। ५ ॥ नळाचनि हस्ते जळी चंड शीळा | गिरी शृंग तर्तील हो जी नृपाळा ॥ वदे निश्चयें आदरे हा समन् । तेणे थोर संतोषला रामचंद्र ।। ६ ।। बहूतां परी राम संतोषवीला | पुढे सिंधु तो ही जळामाजि गेला ।। नळे वानरांची दळे सिद्ध केली । गिरी-शंग आणावया शीघ्र गेली ।। ७ ॥ त्वरें उत्तरे चालिले भार सैरा । बळी धांवती येकमेकां पुढारां ।। शिळा शीखरे झाड खडे प्रचंडे | बळाचे कपी चालवीती उदंडें ॥८॥ कपी धांवती लक्ष कोटयानुकोटी । बळे गर्जती थोर आनंद पोटी ।। गिरी कंदरे देश लंघूनि जाती । शिळा शीखरें शीघ्र घेऊनि येती ॥ ९ ॥ निळे पीवळे श्वेत आरक्त काळे । फिके जांभळे गौर जांभे गव्हाळे ॥ बहू रंग पाषाण नाना परीचे । उभे वक वर्तुळ गाभे गिरीचे ॥ १० ॥ कपीवीर ते pशीघ्र घेऊनि जाती । बळे मघवाचे परी वर्षताती ।। शिळी सेतु बांधी नळू लागवेगें । असंभाव्य ती चालिली शैलशृगें ॥ ११ ॥ कपी मोडिती वाड झाडे कडाडां । कडे पाडिती पर्वतांचे खडाडा ।। उड्या घेति आकाश पंथे धडांडां । बळें टाकिती सिंघु मध्ये थडाडां ॥ १२ ॥ विशाळा जडा वर्तुळा त्या उदंडी । बहू मस्तकी बाहती चंड धोंडी ॥ शिळा शीखरें फोडिती ते अभंगे। नभी भार झेपावती लागवेगें ॥ १३ ॥ कपी मारुती सारिखे जे उडाले । गिरी मंदरा सारिखे चालवीले ।। कपी साक्षपी देव-रूपी बळाचे । कडे लागले १ ते सुवेळाचळाचे ।। १४ ॥ 1 आयकेना (पा० भे०). ८२ कृतांतु-यम. m. चळू ( पा० भे०). ८३ चवों पडूं. ८१ पालाण=पल्याण-खोगोर पूल. n. आनंदला (पा० भे०). . गा ते (पा. मे०). p. सर्व (पा० भे०) ८५ मघवा-इंद्र. q. त्या (पा० भे० ).