________________
युद्धकांड. तया देखतां काळ भीडूं शकेना । तुम्ही मश्यके राक्षसे सर्व सेना ॥ १७ ॥ रणी तीव्र त्या राघवाचेनि बाणीं । तुटो लागले तूमचे पादपाणी ।। धडे मस्तके मेमांसें चिडाणी | न होतां सिता भेटवा चौपपाणी ।। ५८ ॥ . तया बोलतां ते सभा तप्त जाली । सुता मंत्रियांचे मुखी तीव्र बोली ॥ असंभाव्य तो रावणा कोप आला । कुशब्द बहू त्रास बीभीषणाला ॥ ५९॥ सभेमाजि धिक्कारिले रावणाने । उठोनी पदे ताडिले दुर्जनाने ।। बहूतां मधे येकला धर्ममूर्ती । मनी खोचला तो उदासीन चित्तीं ।। ६० ॥ मन भंगला हो तया धार्मिकाचा | पुढे त्याग तात्काळ केला सभेचा ।। उडाला नभोमंडळामाजि वेगीं । पुरोहीत चत्वारि ते पृष्टभागीं ॥ ६१ ॥ झळंबे मनी लोभ त्या सांडि केली । अकस्मात ते वृत्ति भंगूनि गेली ।। पुढे वाक्य बोलोनियां रावणाते । उदासीन तो चालिला व्योम पंथें ॥ ६२ ॥ पुरोहीत चत्वारि ते पृष्ठभागीं । त्वरे उत्तरे चालिले लागवेगी । समुद्रासि लंघूनि पैलाड गेले । नभी पौरखे सुनि ओळखीले ॥ ६३ ।। कपोंद्र ह्मणे पैल पाहे विशाळू । नभी येतसे कोण हा पंच-मेळू ॥ अकस्मात खालावला व्योम-पंथे । भिडो पाहती वानरें त्या अनर्थे ।। ६४ ॥ मिळाले कपी बोलती त्यासि वाचा । अकस्मात आलास तूं कोण कैंचा ।। ह्मणे बंधु मी होय लंकापतीचा परी दास अंकीत या राघवाचा ।। ६५ ॥ परी त्यागिली सर्व येका जिवेशी । करा हो तुम्ही भेटि या राघवाची ।। ह्मणे सत्य बीभीषणू नाम माझे | नव्हे अन्यथा सर्वथा वाक्य दूजे ॥६६ ।। कपी सर्व ही जुत्पती धर्म-मूर्ती । बहूतां परी ऐकिली वाड कीर्ती ।। समस्ती तुम्ही हीत माझे करावे । कृपाळू-पणे राघवा भेटवावे ।। ६७ ।। ह्मणे वीर सुग्रीव नावेक बैसा । त्वरे मात हे जाणवीतो सुरेशा ।। कपीराज तो लागवेगे निघाला । अती आदरे भेटला राघवाला ॥ ६८॥ समाचार साकल्य तो सांगताहे । ह्मणे भेटि नीशाचरू इच्छिताहे ।। परी अंतरी कोण कैसा कळेना । तया ठेवितां राजनीती मिळेना ।। ६९॥ समस्ताकडे पाहिले राघवाने । बहूतांपरी बोलिले तें सभेने ॥ मनी पाहता दाखला दैन्यवाणा । कृपाळपणे आणवी रामराणा ॥ ७० ॥ उभे राहिले भाग्य बीभीषणाचे । करी अंतरीं ध्यान पादांबुनाँचे । भिजे दिव्य सर्वांग त्या अश्रुबिंदी | मिठी घातली राम पादारविंदी ।। ७१ ।। ६१ मंद-चरबी. ६२ चाप-तीरकमटा. ६३ पाणी हात. ६४ मन-मन. ६५ व्योम आकाश.६६ पंथ वाट.६७ पुरोहित उपाध्याय. ६८ नभ-आकाश. ६९ पारखे-परके.g. पुरा (पा. भे.). ७० नावेक क्षणभर. ७१ अबुज-पाण्यांत उगवलेले (कमळ). ७२ अरविंद कमल,