Jump to content

पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नव्हाटे जुना सर्व नानास निवाला । पू. शोडिले सुंदरकांड नव्हाटे जुनाट वनें दाट थाटें । बने मोडिता जाहला कडकडाटे ।। ५५ ॥ फळे भक्षिली सर्व नाना परीची । बहू स्वाद वर्ण कळाकूसरीची ।। कपी वीर तो तृप्त जाला निवाला । पुढे वृक्ष मोडावया सिद्ध जाला ।। ५६ ॥ तरू मोडिले पाडिले ऊपटीले । किती झोडिले झाडिले चूर केले ।। गिरी सारिखे ढीग सांडूनि टाकी । तयाला असंभाव्य राक्षेस हांकी ।। ५७ ॥ वने मोडितां मोडितां हांक नाली । कितीएक ते दैत्यमांदी मिळाली ॥ गोली कमाना करीं भिंडमाळा । बळे हांकितां नाद गेला भुगोळा ॥ ५८ ॥ बहूता बळाचे बहू लोक आले । कितीएक ते धिंग मोठे मिळाले ।। वने वेढिली धांवले काळ जैसे । भुतां खेचरां थोर कल्पांत भासे ।। ५९ ॥ कपी वीर चौताळला वेग केला । कितीएक राक्षेस भंगोनि गेला ।। त्रिकूटाचळी रावणा जाणवीले । वनी वानरे थोर अद्भूत केले ॥ ६ ॥ बळे धांविला कूमरू रावणाचा । सदां अक्षयी वीर मोठ्या बळाचा ।। असंभाव्य राक्षेस धांवोनि आले । कपीलागिं मारावया सिद्ध जाले ॥६१ ॥ बळे आगळा आखया लक्ष भेदी । चुकावी कपी वीर लागों च नेदी।। बहू भागले मारितां भग्न जाले । कितीएक ते दैत्य पोटीं गळाले ॥ ६२॥ पहा हो कपी धीट मोठा पळेना । सदा सर्वदां लक्ष याचे चळेना ।। पुन्हा मागुते वीर ते सिद्ध जाले । कितीएक ते पाश घेऊनि आले ।। ६३ ॥ मुखे बोलती मर्कटा बैसलेसी । समारंगणामाजि युद्धा न येसी ।। कपी वीर तो गर्जला भूभुकारें । समारंगणीं चालिला घोर मारें ।। ६४ ॥ रिपू झोडिले पाडिले वृक्षघातें । भुमी लोळती दैत्य होऊनि प्रेते ॥ पुढे देखिले जंबुमाळ्या कुटीला | बळे आखया आपटीला पिटीला ।। ६५ ।। पळाले फळी फूटली राक्षसांची । पुढे हाक गेली तया आखयाची ॥ त्रिकूटाचळी शोकआरंभ जाला । प्रितीचा बहू आखया तो निमाला ॥ ६६ ॥ पुरीमाजि अंतःपुरी घोष जाले । सुखानंद मंदोनि गेले विझाले ।। बह दुःख जाले च मंदोदरीला । तिने कमरालागि आकांत केला ॥ ६७ ॥ पसे रावण काय रे काय झालें । तुम्हालागिं मारावया कोण आले ।। कंपी येकला बैसला तो पळेना । चळेना ढळेना कदा आकळेना ।। ६८ ॥ तया टाकितां पाश मोठा चि होतो । लघुरूप होऊनि नीघूनि जातो ।। कदां ही पडेना कदां सांपडेना । तेणे मारिली दैत्य ऊदंड सेना ॥ ६९ ॥ विधीलागि बोलाविले रावणाने । कठीणोत्तरी गांजिलें दुर्जनाने ॥ १८ मांदी समुदाय. १९ गलोल गोफण, २० कमान=धनुष्य. २१ खेचर पक्षी. २२ लक्ष-निशाण. २३ निमाला मेला.