________________
श्रीरामदासकृत असंभाव्य त्या दीवट्या दीपथावे | बळे लागवेगें समूदाय धांवे ॥ ४० ॥ पुन्हा मागुती दीप घेऊनि आले | बळें धांवतां पुच्छमारे विझाले ॥ तया लांगुळे रुंधिली सर्व दारे । कपी वीर तो वावरे अंधकारें ॥ ११ ॥ सभामंडपी गुगुल्या तो करीतो । मुखे नासिके कर्ण छेदून नेतो ।। बळे गाल सर्वांग ही बर्बडीतो । "चिरे *फाडितो ओढितो गुर्गुरीतो ॥ १२ ॥ बळाचे महावीर तेथे मिळाले | परी अंधकारे चि कांहीं न चाले ।। किती लोटिले कूटिले चूर केले । भयाभीत कोणास कोणी न बोले ।। ४३ ॥ कपी वीर तो थोर लाहान होतो । धरीतां बळे हात मोडोनि जातो ॥ बुक्या मारतो पांपरा वजथापा । असंभाव्य तो कोपला राव कोपा ।। ४४ ॥ म्हणे वीर हो काय रे काय झाले । कळेना मुखे बोलती काय आलें । भयासूर ते गुर्गुरीते कळेना । करूं काय आम्हांसि ते +आकळेना ।। १५ ।। कपी वीर रायाकडे शीघ्र गेला | बळे थाप मारून मूगूट नेला ।। बरे ठोसरे मारिले रावणाला । म्हणे मारितों रे. तुझ्या आखयाला ॥ ४६ ॥ चिरें सुंदर फाडिली रावणाची । करी भूषणे चूर मुक्ताफळांची ।। कपीने सभा सर्व ही नग्न केली । त्रिकूटाचळी ख्याति ऊदंड जाली ॥ ४७ ।। हाहाकार जाला सभेमाजि मोठा । बळे मारुती मारिताहे चपेटा ॥ सभामंडपी फार आकांत झाला । कपीने पुढे मोकळा मार्ग केला ॥ ४८ ॥ लपाला कपी पुच्छ ओदानि नेले । लघू मश्यकाचे परी रूप केले ।। असंभाव्य त्या दीवटचा चंद्रज्योती । असंख्यात राक्षेस धावूनि येती ॥ १९ ॥ सभामंडपामाजि धांवोनि आले । तेणें नागवे लोक लज्जीत जाले । महावीर मागे पुढे हात देती । कपीने बहूसाळ केली फजीती ॥ ५० ॥ सभामंडपी वस्त्र कोठे दिसेना । भूतासारिखे नागवे लोक नाना ।। चिरे आणिली नेसले स्वस्थ झाले । मनामानि लज्जीत कोणी न बोले ॥ ५१ ॥ कपीवीर तेथूनि वेगें उडाला । अशोकावनामाजि वृक्षों दडाला ।। अधोमूख तो जानकीलागिं पाहे । कपी राममुद्रा पुढे टाकिताहे ।। ५२ ।। सितेने पुढे मुद्रिका ओळरवीली । बहूतां परी शब्द कारुण्य बोली ।। पुढे मारुती भेटला जानकीला । समाचार सांगोनि आनंद केला ।। ५३ ।। क्षुधाक्रांत मी जाहलो फार माते । तनू चालतां चांचरी सर्व जाते ।। बहुतांपरी बोलिला जानकीला । समाचार । सांगाोन आनंद केला ।। ५४ ।। अशोकी बहू लागले वृक्षनाना । पाहतां असंख्यात संख्या असेना ।। १६ चिरें वस्त्रे. * “फेडितो" पाठभेद. + “ आवरेना” पाठभेद. १७ आखया रावणपत्र " अक्ष". " निरोपचि आज्ञेप्रमाणे निघाला" पाठभेद,