Jump to content

पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१००) श्रीरामदासकृत तुरे लाविले घातल्या पुष्पमाळा । कितीएक त्या रत्नमाळा सुढाळा ।। करी कंकणे मुद्रिका लेववील्या । यथासांग सर्वांस संपूर्ण केल्या ।। ६० ।। सभामंडपी फांकल्या रत्नकीळा । समस्तांसि ते जाहली सौख्यवेळा ॥ कितीयेक सांगीतल्या गुप्त गोष्टी । माहावीर आनंदले सर्व पोटीं ।। ६१ ।। स्तुतीउत्तरी सर्व लावण्यखाणी । मुखें बोलिला राम कारुण्यवाणी ॥ तुम्ही कष्ट केले जिवी सर्व भावें । तुम्हांलागि म्यां काय उत्तीर्ण व्हावें ।। ६२ ।। कपी सुग्रिवा अंगदा जांबुवंता । गजा मारुता आणि नैऋत्यनाथा ॥ समस्तांसि सन्मानिले रामचद्रे । सुधाउत्तरी तोषवीले नरेद्रे ।। ६३ ॥ मुखें बोलिजे वैद्यराजासि देवें । कपी तूज ऊचीत म्यां काय द्यावे || वरू दीधला रामचंद्रे उचीती । तझ्या दर्शने लोक आरोग्य होती ॥ ६४ ॥ समस्तां कडे पाहिले राघवाने । तयां सर्व रोमांच आले फराणे || नमस्कारिले स्वामि देवाधिदेवा । ह्मणे राम तो लोभ आतां असावा ।। ६५ ।। असंभाव्य केली स्तुती राघवाची । वदों लागली मंडळी प्रेमळांची ॥ कपी बोलती सर्व कारुण्य वाचा । स्तुती ऐकतो राम सिंधू सुखाचा ।। ६६ ।। गिरी कंदरा माजि आमी असावे । नरां देखतां वानरी शीघ्र जावे ।। शाम समर्थे सवे लाविली मर्कटांला । महा सकृते पार नाही सुखाला ।। ६७ ।।।। प्रभ बोलणे चालणे काय जाणे । बरे वोखटे सर्व काहीच नेणे ।। बहूतां परी चालवीले दयाळे । तम्हां योग्य हे आमुचे तोंड काळे ।। ६८ ॥ कृपाळपणे राघवे थोर केलें । बरे वोखटे सर्व साहून नेले ।। बहू देखिले सौख्य नाना परीचे । प्रभच्या पदालागि हे प्राप्त कैचे ।। ६९ ।। सभाग्याचिया संगतीने असावें । बहता परीचे बह सौख्य द्यावे ॥ तया सारिखे सर्व आम्हांसि जाले । महा वैभवे चित्त सखे निवाले ॥ ७० ॥ नव्हे भेटि नाना परी योगयागें । नव्हे भेटि नाना परी भोग त्यागे। नव्हे भेटि ब्रह्मादिकां शीघ्र काळे । निकटाचळी दाखवीले भपाळे ॥ ७१ ।। कपी रीस ते बोलती दैन्यवाणे । कृपासागरू जीविंचा भाव जाण ।। तयांच्या शिणे देव तो शीणताहे । बहतां परी राम संबोखिताहे ।। ७२ ॥ सवे लागली राघवाची सुटेना । प्रिती गंतली तोडितां ही तुटेना || बह दीस गेले सुखाचेनि योगें। अकस्मात ते द:ख जाले वियोगे ।। ७३ ।। प्रभू संगतीची सवे दृढ केली । अकस्मात कां सर्व छेदनि नेली ।। तयां बोलता जाहला रावणारी | तम्हां भेटि देईन कृष्णावतारी ।। ७४ ।। ६८. मुद्रिका=आंगठ्या. ६९. उत्तीर्ण-उतराई. ७०, वैद्यराज-सजेण नामक वैद्य. ७१., सो संचय.