Jump to content

पान:श्री रामदासस्वामी कृत रामायण.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीरामदासकृत कितीएक ते भोवती भेद नाना । भ्रमों लागले पाय भूमी स्थिरना || INR कितीएक ते टीपऱ्या खेळताती । मिळाले समेळे बहू वाजताती ॥ ३० ॥ घने सुस्वरें नाद कल्होळ जाला । बहूतां परीचा बहू लोक आला || महद्भूत ते मांजली रंग-वेळा । दणाणी मही नाद गेला भुगोळा ।। ३१ ।। निशी प्राप्त जाली असंभाव्य दाटी । बहू दीवट्या लक्ष कोटयानुकोटी ॥ कितीएक ते उंच नेले उमाळे । नळे जाळितां घोष तैसे उफाळे ॥ ३२॥ सरारा फुले धांवती अंतराळी । कडाडीत घोषे निराळी निराळी ॥ भुरारां हाया कितीएक वेळां । बळे पाहती उर्ध्व नक्षत्रमाळा ।। ३३ ॥ बहू औषधे दिव्य नाना परीची। कितीएक तेजाळ ती कूसरीची | घडीने घडी तेजपुंजाळ होती । उजेडे चि ते लोक लोकां पहाती ।। ३४ ॥ पुढे ऊठिला राम तो ते प्रसंगी। प्रभु चालिला भूवनामाजि वेगी ।। समस्तांसि आरोगणा सांग केली। विडे कर्परे घेतले तृप्ति जाली ॥ ३५ ॥ गहे दीधली रम्य दिव्यांबरांची। दळे स्वस्थ जाली रिसांवानरांची ।। कपी वीर राक्षस सूखे निघाले । सषप्तीचियाँ भवनामाजि गले ॥ २६ ॥ सवर्णाचिया मंचकी मद शय्या । वरी सूमने सेज त्या देवराया ॥ सभामंडपी ते निशी अर्ध गेली । प्रभने यथासांग विश्रांति केली ॥ ३७॥ निजेले ऋषी राव तो बंध माता । यथायोग्य विश्रांति जाली समस्ता ।। कितीएक त्या वीरफौजा समस्ती । असंभाव्य तो वाद्यकल्लोळ वस्ती ।। ३८॥ प्रभातींचि ऊठोनियां नित्य नेमे । किजे स्नानसंध्यादिके सांग कम ॥ किती एक दाने कितीकां परींची । धने कांचने भव्य नाना परीची ॥ ३९॥ अळंकार मक्ताफळे मक्तमाळा । कितीएक दिव्यांबरे रत्नमाळा ।। कितीएक धोत्रे कितीएक पात्रे । दिलीं ब्राह्मणा दान राजीवनेत्रे ॥ ४० ॥ कितीएक कोट्यावधी गोधनांची। कितीएक लक्षावधी कुंजरांचा ।। बळाचे बहू अश्व ते पारखीले । धनेशी द्विजा ब्राह्मणां दान केले ॥४१॥ ऋषी बांधवी सारिली स्नानदाने । यथायोग्य उंचासने स्थान मानें। सभेमाजि तो बैसला राम राजा । निघाल्या कपी सि राक्षस फौजा ॥ ४२ ॥ कपीनाथ तो अंगदु जांबुवंतू । कुमद गजू वीनतू वीयवंतू ।। महावीर लंकापती मारुती तो । समख द्विवीद कपी केसरी तो ॥ ४३ ।। प्रमाथी गवायू निळू हेमकूटू । सुषेण नळू मैद मोठा अचाटू ॥ कपी क्रोधनू ऋषभू आणि शर्भू । गवाक्ष दधीमूख स्वेदू शराभू ॥ ४ ॥ कपी रास राक्षस कॉट्यानुकोटी । असंभाव्य ते चालिले रामभेटी ॥ ५८, हवाया चंद्रजोती. ५९. सुषुप्ति-झोंप.