________________
युद्धकोड. ऋषी सांगती हे बरी शुद्ध वेळा । त्वरे बैस भैद्रासनी तूं नृपाळा ।। समस्तांसि आनंद राज्याभिषेके । ऋषी अक्षता टाकिती मंत्रघोषे ।। १५ ।। विधीयुक्त भद्रासनी रामराजा | यथायोग्य संपादिली सांग पूजा ।। कितीएक पुष्पांनळी वाहताती । सानंद आनंद सूखें पहाती ॥ १६ ॥ असंभाव्य नाना परी दान केले । बहतां परी याचा तोषवीलें ।। गिरीचे परी शर्करा ढीग केले । कितेकी समस्तांसि ते पाठवीले ॥ १७ ॥ नभी दाटली मेघडंबे अपारें । कितीएक ती चामरें थोरथोरे ।। असंभाव्य हेलावती रत्नपुच्छे । बह डोलती उन्मते शक तुच्छे ॥ १८ ॥ सचित्र विचित्रे रवीतेजपत्रे । असंभाव्य ती दाटली भव्य छत्रे ।। विशाळा पताका सतेजे निशाण । वरी सर्व आच्छादिले व्योम तेणे ॥ १९ ॥ असंभाव्य ते दाटली भीमसेना । प्रसंगें विरी घाव केला निशाणा ॥ महादिव्य सिंहासनी रामराजा । पहाया भ्रमो लागल्या वीर फौजा ॥ २० ॥ बरी रामराजे गढी ऊभवीली । गजेबे* सखे लोकमांदी मिळाली ॥ झडा घालिती राम पाहावयाला । समस्तां मनी थोर आनंद जाला ॥२१॥ परीमाजि ती वैभवाची अचाटे । दताळी तिताळी उभी लाक-याट ।। खणा दाविती सांगती येकमेकां । बहवीध तो राम वधी अनका ॥ २२॥ दमामे धमामे दडाडां धडाडां । बह वाजती चंड भेरी भडाडा।। ततारे नगारे बह शांख मंगें । किती चौघडे ढोल कर्णे बुरंगे ।। २२ ।। तरे गंभिरे ती बह गर्जताती । कितीएक पांवे मुखा घाष वाता ।। नफऱ्या बह दंदभी घोष जाला । असंभाव्य तो वाद्यमळा मिळाला ॥२०॥ कितीएक ते चौघडे वाजताती । कितीएक ते बागड नाचताता ॥ कितीएक ते मागते मेळ आले । कितीएक ते वेषधारी मिळाले ॥ २५॥ कितीएक थोबे कळावंत गाती । हरीदास ते कीर्तनी गर्जताती ।। कितेकी गुणी नाँचणी नत्यरंगें। अलापे कळा रागरंगे तरंगे ॥ २६ ॥ कितीएक वाखाणिती भाट ब्रीदें । कितीयेक ते छंद नाना विनोदे || दिडीगान ते मांडिले वासदेवी । बह कीनया लाधले लोक जीवीं ॥ २७ ॥ किताएक ते भैरवाचे मिळाले। कमाचे कितीयेक घेऊनि आले ॥ कितीएक ते नाचताती धबाबां । सखे डोलती वाजवीती खबाबां ।। २८ ।। कितीएक ते गारुडी नाचताती। गळे फुगले घागऱ्या लोळ घेती ।। कितीएक ते लोक नाना गणांचे । बिदे अंकुशें लाविले भार कुंचे ।। २९।। ५४. भद्रासन=सिंहासन. रत्नपच्छे-मत्स्य पुच्छे k शक-शुक्र ५५. * गजेब-गजबजे. दुताळी दुमजल्यावर. ५६. तिताळी-तिमजल्यावर. ५७. नाचणी-नाचणान्या स्त्रिया.